Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्यानाशिकहून लवकरच आंतरराष्ट्रीय विमानसेवा

नाशिकहून लवकरच आंतरराष्ट्रीय विमानसेवा

सातपूर । प्रतिनिधी Satpur

नाशिक विमानतळावर (Nashik Airport) आंतरराष्ट्रीय विमानसेवा (International Airlines) हाताळण्यासाठी गरजेच्या असलेल्या पायाभूत सुविधांची उभारणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे नजिकच्या काळात गृह मंत्रालयाकडून (Ministry of Home Affairs) अधिकृतरित्या नाशिक विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्यावर शिक्कामोर्तब केले जाईल असा विश्वास खा.हेमंत गोडसे (mp hemant godse) यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

नाशिक विमानतळावरुन सद्या देशांतर्गत विमान सेवा सूरू आहे. पायाभूत सुविधांच्या उभारणीचे काम गृह मंत्रालयाने नोव्हेबर 2010 ला दिलेल्या परवानगीनंतर सुरू झाले होते. त्यानुसार आंतरराष्ट्रीय विमानसेवेकरिता आवश्यक असणार्‍या इमिग्रेशन चेक पॉइंट (Immigration checkpoint), कस्टम (Custom) यांसारख्या सुविधा उभारण्याची गरज होती. गतवर्षी कस्टम, इमिग्रेशन यांसह संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी खा. हेमंत गोडसे यांच्यासोबत विमानतळाची पाहणी केली होती.

त्यानंतर एचएएलने (HAL) 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून मुंबईच्या (mumbai) ब्युरो ऑफ इमिग्रेशनच्या (Bureau of Immigration) मार्गदर्शनाखाली एचएएलकडून आंतरराष्ट्रीय प्रवाशांकरिता विमानतळावर स्वतंत्र आगमन आणि प्रस्थान सुविधा, कस्टम, इमिग्रेशन काउंटर्स यासारख्या सुविधांची उभारणी करण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. त्यांची अंतिम तपासणी ब्युरोकडून लवकरच केली जाणार आहे. त्यानंतरच गृह मंत्रालयाकडून अधिकृतरित्या नाशिक विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्यावर शिक्कामोर्तब होणार असल्याचे खा. गोडसे यांनी सांगितले.

आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रवास करणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. नाशिक सह उत्तर महाराष्ट्रातून (maharashtra) परदेशात जाणारे पर्यटक (Tourist) व मल्टी नॅशनल उद्योगांच्या प्रतिनिधींना नाशिकला येण्या-जाण्यासाठी ही सेवा उपयुक्त ठरणार असल्याचे उद्योजक व आयमाच्या एव्हिएशन कमिटीचे चेअरमन मनीष रावल (Entrepreneur and Chairman of AIMA’s Aviation Committee Manish Rawal) यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या