Thursday, April 25, 2024
Homeजळगावशिक्रापूर येथील गुन्ह्यात सुनिल झंवरला अंतरीम जामीन मंजूर

शिक्रापूर येथील गुन्ह्यात सुनिल झंवरला अंतरीम जामीन मंजूर

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

शिक्रापूर (Shikrapur) येथील दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात बीएचआर घोटाळ्यातील (BHR scam) मुख्य संशयीत (main suspect)आरोपी सुनिल झंवर (Accused Sunil Zanwar) यांच्यावर ऐकीव माहितीवरुन आरोप लावण्यात आले आहे. या आरोपांमध्ये तथ्य नसून त्यांच्यावर झालेली अटकेची कारवाई योग्य नसल्याचा युक्तीवाद सुनिल झंवरच्या वकीलांनी केल्याने संशयीत आरोपी सुनिल झंवरला मुंबई हायकोर्टाने (Mumbai High Court) अंतरिम जामीन (Interim bail) मंजूर (Approved) केला आहे.

- Advertisement -

राज्यासह इतर राज्यात झालेला भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेतील अपहाराच्या प्रकरणात पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर येथील गुन्ह्यात मुख्य संशयित सुनील झंवरचा अटकपूर्व जामीन अर्ज पुणे न्यायालयाने ऑक्टोंबर फेटाळून लावला होता. त्यानंतर झंवरने मुंबई हायकोर्टात जामीन अर्ज दाखल केला होता. परंतू या आधीदि. 20 ऑक्टोंबरला डेक्कनच्या गुन्ह्यात झंवरचा नियमित जामीन अर्ज न्यायलयाने फेटाळून लावला होता. मात्र, आता शिक्रापूरच्या गुन्ह्यात अंतरिम अटकपूर्व जामीन मिळाला आहे. मात्र डेक्कन येथिल गुन्ह्यात झंवरच्या जामिनावर कुठल्याच प्रकराची कामकाज न झाल्याने या गुन्ह्यात सुनिल झंवर हा अद्याप पुण्याच्या येरवाडा कारागृहातच आहे.

या मुद्दांवर झाला युक्तीवाद

मुंबई हायकोर्टात युक्तीवाद करतांना अ‍ॅड. अनिकेत निकम यांनी एकाच गुन्ह्याची तीन ठिकाणी फिर्याद देण्यात आली असून ते चुकीचे आहे. तसेच कायद्याला धरून नसल्याचे न्यायालयाला सांगितले. तसेच शिक्रापूरच्या गुन्ह्यात ऐकीव माहितीवरून आरोप लावण्यात आलेले आहेत. परंतू ऐकीव माहितीच्या आरोपांमध्ये तथ्य नसते असेही त्यांनी न्यायालयापुढे सांगितले. त्यामुळे संशयित आरोपीला अटक करणे कारवाई योग्य होत नाही.

त्रास देण्याच्या उद्देशाने पुण्याला गुन्हे दाखल

बीएचआर प्रकरणातील गुन्ह्याचा संबंध जळगावशी असतांना देखील या प्रकरणी गुन्हे मुद्दाम पुण्यात दाखल करण्यात आले. जेणे करून यातील आरोपींना त्रास झाला पाहिजे, असेही अ‍ॅड. निकम यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. या अर्जावर पुढील सुनावणी 20 डिसेंबरला होणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या