Friday, April 26, 2024
Homeनाशिकअंतिम प्रभाग रचनेकडे इच्छुकांची नजर

अंतिम प्रभाग रचनेकडे इच्छुकांची नजर

नाशिक । फारुक पठाण Nashik

नाशिक महापालिका निवडणुकीला Upcoming NMC Elections आता फक्त दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. यंदाची निवडणूक तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीने होणार आहे. यामुळे प्रशासकीय पातळीवर निवडणूक आयोगाच्या Election Commission निर्देशानुसार प्रभाग रचनेचे काम पूर्ण करून प्रभाग रचनेचा Ward Structure कच्चा आराखडा नुकताच राज्य निवडणूक आयोगाकडे रवाना करण्यात आला आहे, तर आता इच्छुकांची नजर प्रभाग आराखडा जाहीर होण्याकडे लागली आहे.

- Advertisement -

विविध राजकीय पक्षांचे तसेच अपक्ष उमेदवारांनी आपण कोठे निवडणूक लढणार व कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार याबाबत पत्ते उघड केले नाहीत. जोपर्यर्ंत अंतिम रचना अर्थात वॉर्ड सीमा कटिंग समोर येत नाही तोपर्यंत कमालीची गुप्तता पाळण्यात येत आहे.

नाशिक महापालिका निवडणूक सर्वच राजकीय पक्षांसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. भारतीय जनता पक्षाला 2017 साली पहिल्यांदाच बहुमत मिळाल्याने सलग पाच वर्षे त्यांचाच महापौर होता. यामुळे पुढील काळातही आपलीच सत्ता कायम राखण्यासाठी कठोर परिश्रम घेण्यात येत आहेत. तसे पाहिले तर भाजपचे पारडे जड मानले जात आहे. कारण मोठ्या प्रभागांचा फायदा भाजपला होतो, असा आजवरचा अनुभव आहे.

तर दुसरीकडे शहरातील चारपैकी मध्य नाशिक, पश्चिम नाशिक व पूर्व नाशिक हे तीन विधानसभा मतदारसंघ थेट भाजपच्या ताब्यात आहेत. तर सध्या पक्षाचे 66 नगरसेवक मैदानात आहेत. दुसरीकडे केंद्रात सत्ता असून नाशिक जिल्ह्यात केंद्रीय राज्यमंत्रीदेखील आहेत. या सगळ्या जमेच्या बाजू असल्या तरी एकदिलाने काम झाले तरच पुन्हा सत्ता हातात येणार, ही जाणीव पक्षाच्या वरिष्ठांना चांगलीच असल्याने आतापासूनच लहान-मोठ्या बैठका (यामध्ये काही गुप्त) सुरू झाल्या आहेत. तसेच वरिष्ठ पदाधिकार्‍यांचे दौरेदेखील वाढले आहेत.

शिवसेनेचीही जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते खा. संजय राऊत यांनी वर्षाच्या सुरुवातीलाच नाशिकचा आगामी महापौर शिवसेनेचा होणार, अशी घोषणा केली आहे. यामुळे शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारला आहे. राज्यात सत्ता व आपला मुख्यमंत्री यामुळे शिवसैनिक नगरसेवक सुधाकर बडगुजर यांना दिल्यानंतर शहरात अनेक भागात शाखा सुरू होऊन संघटन मजबूत होतांना दिसत आहे.

राष्ट्रवादी काँंगे्रसने देखील तयारीत कसूर सोडलेली नाही. पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये वेगळा जोश पहायला मिळत आहे व सध्या असलेल्या जागांमध्ये शंभर टक्के वाढ होणार, असा दावा करण्यात येत आहे. पक्षाचे संघटन देखील मागील काही काळात मजबूत झाल्याचे दिसत आहे. नाशिक हा कधी काळी कॉंग्रेस पक्षाचा बालेकिल्ला मानला जायचा, मात्र आता तशी परिस्थिती दिसत नाही. शहराध्यक्ष वेळ देत नसल्याची तक्रार आहे. तर मुस्लीम बहुल जुने नाशिक भागात मुस्लीम चेहरा नसल्याने देखील फटका बसण्याची शक्यता आहे. संघटन देखील काही भागात कमकुवत असल्याचे दिसते.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना यंदा जोमात कामाला लागली आहे. पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्यासह अमित ठाकरे यांचे सतत दौरे होत आहेत. आगामी निवडणूक युवा नेते अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली होणार असल्याचे चित्र आहे. यामुळे तरुण वर्गात विशेष आनंद व्यक्त होत आहे.

2012 ते 2017 या पाच वर्षाच्या सत्ता काळात शहराचा झालेला विकास, भ्रष्टाचाराचा एकही आरोप न होता कोट्यवधींची झालेली कामे आदी लोकांपर्यंत नेण्याची तयारी मनसेनेची असून काम देखील सुरू झाले आहे. दुसरीकडे समाजवादी पार्टी, आरपीआय, एमआयएम, बसपासह इतर काही पक्षांनी देखील मनपा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. तर अपक्षांची संख्या देखील मोठी आहे. मात्र जोपर्यंत वॉर्ड कसा तयार होत आहे,याचे चित्र स्पष्ट होत नाही तापर्यंत कोणीही आपले पत्ते उघड करण्यास तयार नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या