Thursday, April 25, 2024
Homeनगरउन्हाची तीव्रता वाढली

उन्हाची तीव्रता वाढली

वांगी (वार्ताहर) –

एप्रिल महिना सुरू झाला असून उन्हाची तीव्रता प्रचंड वाढली आहे. जिवाची लाही लाही करणारे ऊन अशा स्थितीत

- Advertisement -

शेतमजूर कांदा काढणीचे कामे करत आहेत.

श्रीरामपूर तालुक्यातील वांगी, खिर्डी, गुजरवाडी, कारेगाव या परिसरात कांदा पीक मोठ्या प्रमाणात असल्याने मजुरांकडून कांदा काढणीची कामे वेगाने सुरू आहेत. अशावेळी रखरखत्या उन्हात काम करणार्‍या मजुरांसाठी थंडपेय विक्रेते शेतकर्‍यांच्या बांदावर जाऊन थंड पेयेची विक्री करत आहेत.

यावर्षी उशिरा कांदा लागवड झाल्याने एप्रिल-मे या महिन्यापर्यंत कांदा काढणीचे कामे सुरू राहणार आहेत, मात्र उन्हाचा पारा वाढल्याने यावर्षी गोल्टीचे प्रमाण जास्त आहे, त्याचा विपरीत परिणाम कांदा उत्पन्नावर होणार आहे. त्याशिवाय इथून पुढे उन्हाचा पारा असाच वाढत राहिला तर मोठ्या प्रमाणात कांदा खराब होण्याची शक्यता आहे, असे जाणकार शेतकर्‍यांचे मत आहे, एकीकडे उन्हाचा चटका, तर दुसरीकडे व्यापार्‍यांकडून कांदा दरात फटका, अशा दुहेरी संकटात शेतकरी आहे. एकंदरीतच अशा परिस्थितीत शेतीशी घट्ट नाती असणारे शेतकरी शेतमजूर आपले कर्तव्य पार पाडीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या