Saturday, April 27, 2024
Homeनाशिकठेवीदारांचे पैसे न मिळाल्यास तीव्र आंदोलन - चिंतामण गावित

ठेवीदारांचे पैसे न मिळाल्यास तीव्र आंदोलन – चिंतामण गावित

सुरगाणा । प्रतिनिधी Surgana

सुरगाणा तालुक्यासह जिल्ह्यातील एनडीसीसी बँका पुर्ववत सुरू करून लाखो खातेदारांच्या खात्यात जमा असलेले कोट्यावधी रुपये परत देण्याची मागणी या बँकेचे माजी उपाध्यक्ष चिंतामण गावित यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

- Advertisement -

सुरगाणा शहरासह तालुक्यातील उंबरठाण, बाऱ्हे, बोरगाव याठिकाणी एनडीसी (जिल्हा बँक) बँकेत शेतकरी, नोकरदार, सेवानिवृत्त कर्मचारी तसेच ईतर खातेदारांच्या खात्यात कोट्यावधी रुपये नोटबंदीमुळे अडकून पडले आहेत. या बॅ॑केतील व्यवहार कधीतरी सुरळीत चालू होतील अशी सर्वसामान्यांची अपेक्षा होती. मात्र मोठा कालावधी उलटूनही व्यवहार सुरू झाले नाहीत. त्यामुळे असंख्य खोतेधारकांना आर्थिकदृष्ट्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

जिल्हा बँकेच्या सुरगाणा, बाऱ्हे, उंबरठाण व बोरगाव येथील शाखांमध्ये तालुक्यातील सर्व शेतकरी, शेतमजूर, धान्य खरेदी महामंडळ, महिला बचत गट, बॅ॑क कर्मचारी, सर्व ग्रामपंचायत मधील गावकरी, शिक्षक, सेवानिवृत्त कर्मचारी आदींच्या रकमा अडकल्या आहेत. ह्या परिस्थितीस जबाबदार असणाऱ्या बॅ॑केच्या भोंगळ कारभारामुळे ही बॅ॑क बंद असल्यामुळे सन २०१५ – १६ पासून खातेदारांना निराशेने ग्रासले आहे. येत्या सात दिवसांत ठेवीदारांचे रुपये न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा चिंतामण गावित यांनी निवेदनाद्वारे दिला असून यावेळी कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी संपूर्णपणे जिल्हा बँक व प्रशासनाची राहील असे म्हटले आहे.

याबाबतचे निवेदन आमदार नितीन पवार, एनडीसी बॅ॑केचे व्यवस्थापकीय संचालक, तहसिलदार, पोलिस ठाणे आदींना देण्यात आले आहे. या निवेदनावर अशोक आहेर, राजू पवार, नवसु गायकवाड, माधव पवार, तुकाराम देशमुख, रघुनाथ जाधव, मोहन गांगोडे यांचेसह अनेक खातेदारांची स्वाक्षरी आहे.

नोटबंदीनंतर गेल्या चार वर्षांपासून सर्व खातेदारांच्या खात्यात जमा असलेले त्यांचे कोट्यावधी रुपये मिळाले नाहीत. त्यामुळे सर्वांनाच आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. येत्या सात दिवसांत खातेदारांचे रुपये न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. त्यावेळी कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी संपूर्णपणे जिल्हा बँक व प्रशासनाची राहील. —

चिंतामण गावित – माजी उपाध्यक्ष (एनडीसी बॅ॑क)

सुरगाणा तालुक्यातील 195 सेवानिवृत्त कर्मचारींचे एक कोटी बारा लाख रुपये , नाशिक जिल्हा मजूर सहकारी संघाचे संपूर्ण जिल्ह्यात सव्वा सात कोटी रुपये , शेतकरी व नोकरदार वर्गाचे तसेच ईतर खातेदारांचे कोट्यावधी रुपये या जिल्हा बँकेच्या (एनडीसी) शाखांमध्ये अडकलेले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या