Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रविमा कंपन्यांनी तक्रारी निकाली काढाव्यात

विमा कंपन्यांनी तक्रारी निकाली काढाव्यात

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

विमा कंपन्यांनी Insurance companies प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत Prime Minister’s Crop Insurance Scheme स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत प्राप्त तक्रारी तातडीने निकाली काढाव्यात, असे निर्देश कृषी मंत्री दादा भुसे Agriculture Minister Dada Bhuse यांनी दिले.

- Advertisement -

प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत सहभागी विमा कंपन्यांकडून स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि पीक काढणी पश्चात प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या कार्यवाहीबाबत भुसे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आढावा बैठक झाली.

नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे काम अतिशय धीम्या गतीने सुरू आहे.संबंधित कंपन्यांना पंचनामे करण्याची गती वाढविण्याच्या अनुषंगाने सूचना देण्यात यावी. पंचनामे करणाऱ्यांचे मनुष्यबळ वाढविण्यात यावे, अशी सूचना भुसे यांनी यावेळी केली. सोयाबीन पीक काढण्याच्या अवस्थेत असल्यामुळे पंचनामे करण्याच्या वेळी पीक उपलब्ध नाही या कारणामुळे विमा दावे अपात्र ठरवू शकत नाही, असेही भुसे यांनी स्पष्ट केले.

प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम २०२० मधील बुलढाणा जिल्ह्याची प्रलंबित नुकसान भरपाई ६४ कोटी ५९ लाख रुपये ही रक्कम पात्र शेतकऱ्यांना तातडीने अदा करण्यात यावी, असे निर्देशही भुसे यांनी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीला दिले. त्यावर येत्या ८ दिवसात ही रक्कम शेतकऱ्यांना देण्यात येईल, अशी माहिती कंपनीच्या प्रतिनिधींनी दिली.

बैठकीस खासदार प्रतापराव जाधव, आमदार संजय कुटे, संजय रायमुलकर, कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, संचालक, कृषि आयुक्तालय विकास पाटील, मुख्य सांख्यिकी कृषि आयुक्तालय विनयकुमार आवटे आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या