Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याभाजप कार्यालयात गिरीश महाजनांना शिवीगाळ

भाजप कार्यालयात गिरीश महाजनांना शिवीगाळ

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

माजी जलसंपदा मंत्री आमदार गिरीष महाजन यांना जळगावातील एका कार्यक्रमात भाजप कार्यालयात कार्यकर्त्याने

- Advertisement -

शिवीगाळ केल्याचा प्रकार शुक्रवारी रात्री घडला. याबाबत मात्र पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.

शुक्रवारी जिल्हा भाजप कार्यालयात कोअर कमेटीची बैठक होती. 9.30 वाजेच्या सुमारास ही बैठक पार पडल्यानंतर गिरीष महाजन भाजप कार्यालयातून बाहेर पडले असता, तेथे उपस्थित विजय नामक कार्यकर्त्याने महाजनांना शिवीगाळ केली.

हा प्रकार एवढ्यावरच थांबला नाहीतर, त्याने परिसरात उभ्या असलेल्या एका कारवरदेखील दगडफेक केली.

मात्र ही व्यक्ती भाजपाचा कार्यकर्ता नूसन मनोरुग्ण असल्याचे भाजपाकडून सांगण्यात आले. दरम्यान या प्रकारानंतर घटनेची माहिती पोलिसांना कळविण्यात आली होती.

पोलिसांनी घटनास्थळी येवून पाहणीदेखील केली. मात्र कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या