Thursday, April 25, 2024
Homeजळगावकडक निर्बंधाचे पालन ; पोलीस अधीक्षकांनी दिल्या कारवाईच्या सूचना

कडक निर्बंधाचे पालन ; पोलीस अधीक्षकांनी दिल्या कारवाईच्या सूचना

जळगाव – Jalgaon

जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता कडक निर्बंध लागू केले आहे. आज जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.प्रविण मुंढे यांनी शहरातील बाजारपेठ आणि व्यापार संकुलांची पाहणी करून अनावश्यक सुरु असलेल्या दुकानांवर कारवाई करण्याच्या सूचना संबंधीत अधिकाऱ्यांना दिल्या.

- Advertisement -

नागरिकांकडून कडक निर्बंधांचे पालन होते कि नाही याचाही आढावा घेण्यात येत आहे. जिल्हाधिकारी यांनी ५ एप्रिल ते ३० एप्रिल पर्यंत कडक निर्बंध लावण्यात आले. यापार्श्वभूमीवर आज ७ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी शहरातील सुभाष चौक, गांधी मार्केट, फुले मार्केट, दाणबाजार, गोलाणी मार्केट परिसरात पाहणी केली.

याप्रसंगी उपायुक्त संतोष वाहूळे, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय येरूळे, शनीपेठ पोलीस ठाण्याचे पो.नि. विठ्ठल ससे, पोहेकॉ विजय निकुंभ यांच्यासह महापालिका कर्मचारी व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या