Tuesday, April 23, 2024
Homeनाशिकराजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद यांचे जीवन चरित्र प्रेरणादायी : करंंजकर

राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद यांचे जीवन चरित्र प्रेरणादायी : करंंजकर

नाशिक l Nashik

शिवसेनेतर्फे राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात उत्साहात साजरी झाली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंंजकर, माजी जिल्हाप्रमुख सुनिल बागुल यांच्या हास्ते राजमाता जिजाऊ भोसले व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले.

- Advertisement -

राजमाता जिजाऊ यांचे जीवनचरित्र अत्यंत प्रेरणादायी आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून त्यांनी रयतेचे स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज घडविले. जिजाऊंचे व्यक्तिमत्व म्हणजे धैर्य, शौर्य, आत्मविश्वास आणि गरिबां विषयीची तळमळ याचे प्रतिक होते.

त्यांनी युद्धकलेत नैपुण्य मिळविले होते. त्याचा उपयोग पुढे शिवरायांना युद्धकला व राजनीतीचे शिक्षण देण्यात झाला. शिवरायांमध्ये त्यांनी प्रचंड आत्मविश्वास निर्माण केला. शिवरायां प्रमाणेच मावळ्यांना सुद्धा त्यांनी मातृप्रेम दिले. त्यामुळेच राजमाता जिजाऊ या खऱ्या अर्थाने स्वराज्यमाताच आहेत, असे करंंजकर यांनी आपल्या भाषणात सांगितले.

तर शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी स्वामी विवेकानंद यांनी परदेशात भारतीय संस्कृतीचा सुगंध पसरविला. तत्त्वज्ञान आणि इतिहास या विषयाचे ते गाढे अभ्यासक होते. योग, राजयोग, ज्ञानयोग असे ग्रंथ लिहून त्यांनी तरुण जगाला नवा मार्ग दाखविला. तेजस्वी व्यक्तिमत्त्वाचे स्वामी विवेकानंद यांचे विचार खूप प्रभावी होते. ते केवळ एक संतच नव्हे तर महान देशभक्त, उत्कृष्ट वक्ता, थोर विचारवंतही होते.

युवकांचे ते प्रेरणास्त्रोत होते. त्यामुळेच त्यांची जयंती युवा दिवस म्हणूनही साजरी केली जाते, असे बडगुजर यांनी आपल्या भाषनात सांगितले. यावेळी शिवसेना माजी जिल्हाप्रमुख दत्ताजी गायकवाड, महिला आघाडीच्या जिल्हा संघटक मंगला भास्कर, माजी महानगरप्रमुख सचिन मराठे, माजी महानगर संघटक निलेश कोकणे, उप महानगर प्रमुख सुनील जाधव, सचिन बांडे, शिवसेना पदाधिकारी सुभाष गायधनी, नाना पाटील, चंद्रकांत गोडसे, विरेंद्र टिळे, दिलीप मोरे, सचिन पिंगळे, पवन मटाले, संदीप लबडे, प्रमोद नाथेकर, नाना काळे, सचिन साळुंके, गुड्डी रंगरेज, मयुर जुन्नरे, सुरेश पाटील, आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या