Thursday, April 25, 2024
Homeजळगावपोनि. जयपाल हिरेंसह 13 जणांविरुद्ध होणार गुन्हा दाखल

पोनि. जयपाल हिरेंसह 13 जणांविरुद्ध होणार गुन्हा दाखल

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

तीन दुकानदारांना (Shopkeepers illegally) बेकायदेशीररित्या पोलीस ठाण्यात (police station) डांबुन ठेवणे. तसेच त्यांच्याकडून खंडणी वसुल (Collection of extortion) करुन त्यांची दुकाने जमिनदोस्त केल्याप्रकरणी अमळनेर पोलिस (Amalner Police Station) ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक (Inspector of Police) जयपाल हिरे यांच्यासह 13 जणांविरूध्द गुन्हा दाखल (Filed a case) करण्याचे आदेश अमळनेर जिल्हा न्यायाधीश व अतिरिक्त सत्र न्यायाधीश-2 यांच्या न्यायालयाने दिले.

- Advertisement -

अमळनेर येथील बसस्थानकाजवळील खासगी जागेवरील दुकानदारांना 9 मार्च 2022 रोजी अमळनेर तत्कालीन पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांनी 28 तास डांबून ठेवून त्यांच्याकडून प्रत्येक 1 लाख रूपयांची खंडणी वसूल केल्याप्रकरणी अमळनेर न्यायालयात व्यावसायिक विजयकुमार ढवळे यांच्यातर्फे एन.व्ही.भावसार यांनी न्यायालयात खटला दाखल केला होता. या खटल्यात युक्तीवाद होवून गुरूवारी जिल्हा न्यायाधीश-2 व अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी.आर.चौधरी यांनी निकाल दिला

. त्यात पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्यासह सात पोलिस आणि इतर असे एकूण 13 जणांविरूध्द 156 (3) नुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्याची चौकशी स्थानिक गुन्हे शाखेच्या देखरेखीत व्हावी.

या संदर्भातील गुन्ह्याच्या तपासानंतर फौजदारी प्रक्रिया संहिताचे कलम 173 अथवा 170 अंतर्गत जो काही अंतिम चौकशी निष्कर्ष आहे, तो दाखल करावा, असे आदेशात म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या