बोदवडकरांसाठी पो.नि.बळीराम हिरे…एक पाऊल पुढे!

jalgaon-digital
1 Min Read

बोदवड – प्रतिनिधी Bodwad

बोदवड तालुक्यातील सामान्य माणूस आणि व्यावसायिक बांधव यांना कोणी अकारण त्रास देत असेल किंवा धमकावत असेल तर त्याच क्षणी मला वैयक्तिक मोबाईल नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक बळीराम हिरे यांनी सोशल मीडियावर केले आहे.

त्यांनी एक पाऊल पुढे, टाकत व्हाट्सएप व फेसबुकवर पुढीलप्रमाणे पोस्ट शेअर केली आहे…..”मी पोलीस निरीक्षक बोदवड श्री.हिरे सूचित करू इच्छितो की, कोणत्याही व्यापारी बंधूंना व नागरिकांना विनाकारण कोणी काही त्रास होत असेल, कोणी धमकावत असेल, ब्लॅक मेकिंग करीत असेल किंवा मारझोड करीत असेल तर आपण माझ्या पो.नि.हिरे बोदवड यांच्या मो क्र 8928840354 यावर घटनेची सूचना/खबर द्यावी जेणेकरून योग्य मदत देता येईल व जनतेचा संरक्षण होईल!” बोदवड व्यापारी संघाचे अध्यक्ष गोपाल अग्रवाल आणि सामान्य जनतेने समाधान व्यक्त केले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *