PHOTO : ‘मेड इन इंडिया’ आयएनएस विक्रांत युद्धनौका नौदलाच्या सेवत दाखल

jalgaon-digital
1 Min Read

मुंबई | Mumbai

आजचा दिवस हा भारतीय नौदलासाठी महत्त्वाचा दिवस आहे. कारण पहिली स्वदेशी युद्धनौका आयएनएस विक्रांत (INS Vikrant) भारतीय नौदलात (Indian Navy) सामील झाली आहे. कोची येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला. भारतीय नौदलाची (Indian Navy) ताकद आणखी वाढली आहे.

आयएनएस विक्रांत ही विमानवाहू युद्धनौका आहे. आयएनएस विक्रांत म्हणजे समुद्रातला बाहुबली आहे. २०,००० कोटी रुपये खर्चून बांधलेली ही युद्धनौका ५३ एकरांवर पसरलेली असून ती १५ मजली इमारतीइतकी उंच आहे. एकाच वेळी ३० पेक्षा जास्त विविध प्रकारची लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर वाहून नेण्याची विक्रांतची क्षमता आहे.

विक्रांतचे वजन हे तब्बल ४० हजार टन एवढे असून पूर्ण क्षमतेने कार्यरत असताना हे वजन ४५ हजार टन एवढे असते. एका दमात १५ हजार किलोमीटर एवढा पल्ला गाठण्याची विक्रांतची क्षमता आहे. तब्बल १४०० पेक्षा जास्त नौदल सैनिक अधिकारी-कर्मचारी हे विक्रांतवर तैनात राहू शकतात. हवेतील १०० किलोमीटर पर्यंतचे विविध उंचीवरील लक्ष्य भेदणारी बराक-८ ही क्षेपणास्त्रे विक्रांतवर तैनात असणार आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *