Wednesday, April 24, 2024
HomeUncategorizedPhoto : स्वदेशी INS Karanj पाणबुडी नौदलात दाखल

Photo : स्वदेशी INS Karanj पाणबुडी नौदलात दाखल

भारतीय नौदलासाठी स्कॉर्पिन प्रकारची तिसरी पाणबुडी आयएनएस करंज (INS Karanj – third Kalvari class Submarine) मुंबईच्या नौदल गोदीत झालेल्या औपचारिक कार्यक्रमात नौदलाच्या सेवेत दाखल झाली.

१९७१ च्या भारत- पाकिस्तान युद्धादरम्यान कमांडिंग ऑफिसर असलेले, माजी नौदलप्रमुख अ‍ॅडमिरल व्ही.एस.शेखावत, परम विशिष्ट सेवा पदक, अति विशिष्ट सेवा पदक, वीरचक्र , (निवृत्त) या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. फ्रान्सच्या मे.नेव्हल ग्रुप या कंपनीच्या संयुक्त सहभागाने भारतात माझगाव डॉक शिपबिल्डर्स (मर्या.) या मुंबईतील कंपनीतर्फे स्कॉर्पिन श्रेणीतील एकूण सहा पाणबुड्यांची निर्मिती केली जात आहे. आय.एन.एस. करंज ही पाणबुडी पश्चिमी नौदल कमांड ताफ्याचा भाग असेल आणि कमांडच्या शस्त्रास्त्रांचा आणखी एक अत्यंत शक्तिशाली विभाग म्हणून काम करेल.

- Advertisement -

गच्चीवरच फुलवली कमळ, कुमुदिनी व जलीय वनस्पतींची बाग..!

या पाणबुडीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. अत्याधुनिक रडार यंत्रणा पाणबुडीत बसवण्यात आली आहे. ही ६७.५ मीटर लांब, १२.३ मीटर रुंद, १५६५ टन वजनाची पाणबुडी आहे. दीर्घकाळ पाण्याखाली राहण्याची क्षमता या पाणबुडीत आहे. स्कॉर्पिन प्रकारच्या पाणबुड्या जगातील पारंपरिक प्रकारच्या पाणबुड्यांतील सर्वात आधुनिक पाणबुड्या आहेत.

या पाणबुड्यांमध्ये जगातील अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरले असून त्या याच प्रकारच्या याआधी कार्यरत असलेल्या पाणबुड्यांपेक्षा अत्याधिक घातक आणि उत्तम कामगिरी करणाऱ्या आहेत. समुद्राच्या पाण्यावरील तसेच पाण्याखालील कोणत्याही प्रकारच्या आव्हानाशी सामना करण्यासाठी या पाणबुड्या शक्तिशाली शस्त्रास्त्रे आणि संवेदकांनी सुसज्जित आहेत.

तुर्कमेनिस्तानच्या विशेष सैन्यदलाला भारतीय विशेष सैनिकदल प्रशिक्षण केंद्रात ‘कॉम्बॅट फ्री फॉल’चे प्रशिक्षण, पाहा फोटो

करंज पाणबुडीचा समावेश हे भारतीय नौदलासाठी देश उभारणीमध्ये नौदलाची एकात्मिक भूमिका मजबूत करणारे एक पुढचे पाऊल असून जागतिक पातळीवर महत्त्वाची जहाजे आणि पाणबुड्या यांची बांधणी करण्यात माझगाव डॉक शिपबिल्डर्स या कंपनीकडे असलेल्या सक्षमतेचे प्रतिबिंब देखील आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या