Friday, April 26, 2024
Homeजळगाववरणगाव पाणीपुरवठा योजनेच्या चौकशीचे आदेश

वरणगाव पाणीपुरवठा योजनेच्या चौकशीचे आदेश

वरणगाव Varangaon । वार्ताहर

तत्कालीन ग्रामपंचायतच्या (Gram Panchayat) कार्यकाळात वरणगावकरांना शुद्ध व मुबलक पाणी पुरवठा (Pure and abundant water supply) व्हावा या दृष्टीकोनातून वरिष्ठांच्या प्रयत्नांनी शासनाकडून (government) साडेतेरा कोटी रूपयांचा (Fund of Rs. 13.5 crore) निधी खर्च करून पाणी पुरवठा योजना (Water supply scheme) निर्माण करण्यात आली होती. परंतू योजनेत मोठया प्रमाणात भ्रष्टाचार (Corruption) झाल्याचा राष्ट्रीय कॉग्रेसचे (National Congress) शहराध्यक्ष अशपाक काझी (Ashpak Qazi,) यांनी आरोप (Allegations) करून सदर योजनेचे ऑडिटसह चौकशीची मागणी नगरविकास मंत्रालयाकडे (Ministry of Urban Development) केली होती त्या अनुशंगाने वरणगाव पालिकेला पत्र प्राप्त झाले आहे.परंतू असे असले तरी खरोखर साडेतेरा कोटिच्या योजनेत झालेला भ्रष्टाचार उघड होईल का? असा प्रश्न गावकर्‍यांना पडला आहे.

- Advertisement -

पुर्वीपासुन तत्कालीन ग्रामपंचायतच्या कार्यकाळात शहरात लोकसंख्येअभावी ग्रामपंचायतकडून सामूहिक पाणीपुरवठा योजनेतून पीण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र शहराच्या विस्तारात बदल होत गेल्याने सामुहिक पाणीपुरवठा योजनेवर पाणीपुरवठ्याचा ताण व नागरीकांचे पाण्यासाठी होणारे हाल बघता वरीष्ठांनी साडेआठ कोटी रूपयांची पाणी पुरवठा योजना मंजूर करून आणली होती. जीवन प्राधिकरण विभागाने सदर योजना निर्मिती करीता केली असता टप्प्या,टप्प्याने या योजनेला साडे तेरा कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते.

सदर योजनेचे काम ठेकेदाराने सरपंच व सदस्याच्या मर्जीप्रमाणे केले असल्याचा आरोप राष्ट्रीय कॉग्रेसचे शहर अध्यक्ष अशपाक काझी यांनी केला आहे. शासनाने मंजूर केलेल्या नकाशा व वर्कऑर्डर, इस्टीमेट नुसार ठेकेदाराने पाणीपुरवठा योजनेचे काम केले नसुन जिवन प्राधिकरण विभागाच्या अधिकार्‍यांनी सुद्धा त्यावेळी दुर्लक्ष केले आहे. सदर योजनेची मुख्य जलवाहिनीला नकाशाप्रमाणे नअंथरता नागमोडी सारखी टाकण्यात आली आहे. त्यामुळे पाण्याचा प्रवाह वाढवल्यास मुख्य जलवाहिनी वारंवार उखडत असते. तर इस्टीमेट नुसार नागरीकांच्या नळापर्यंत पाणी पुरवण्यासाठी उत्कृष्ठ व मोठी साईजचे पाईप असणे अपेक्षीत होते मात्र ते पाईप निकृष्ठ दर्जाचे व लहान साईजचे वापरले असल्याने त्यांना सुध्दा गळत्या लागल्या आहेत.

तर मुख्य जलवाहिनीतील पाण्याचा प्रवाह कमी जास्त होत असतांना त्यातील हवेचा दाब सम प्रमाणात रहावा म्हणुन व्हॉल्व लावले आहेत परंतु ते सुद्धा हलक्या दर्जाचे असल्याने त्यामधुन नेहमीच लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. सदर योजनेचा लाभ वरणगावकरांना होत असला तरी जिवन प्राधिकरण विभागाने अद्याप हस्तांतर करून दिलेली नाही. त्यामूळे सद्या असलेली नगर परीषद देखभाल दुरुस्थी करीत नाही. त्यामुळे नागरीकांना दूषित पाणीपुरवठा होत आहे. सदर विषयाचा पाठपुरावा म्हणुन येथील राष्ट्रीय कॉग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी नगरपरीषदेकडे पत्रव्यवहार केलेला आहे. मात्र योजनेचे सुत्र नगर परिषदे नसल्याने अशपाक काझी यांनी नगरविकास मंत्रालयात योजनेची निर्मिती करतांना मोठा भ्रष्टाचार झाला आहे. अद्याप योजनेचे ऑडिट झालेले नाही. योजना निर्मितीचे सर्वेकाम निकृष्ठ आहेत अशी तक्रार दि 28 जून 21 ला केली होती त्या अनुशंगाने नगरविकास मंत्रालयामधुन नगर विकास मंत्री यांचे विषेश कार्य अधिकारी उ. ना. कर्दळ कक्ष अधिकारी मुंबई यांनी वरणगाव नगरपरीषदेला योजनेची चौकशी व ऑडिट, नियमानुसार तपासणी, कार्यवाही करून, मुद्देनिहाय वस्तुनिष्ठ अहवाल आपल्या स्वंयस्पष्ट अभिप्रायासह शासनास सादर करण्याचे पत्र दिले आहे. मात्र या योजनेची चौकशी होईल? खरच भ्रष्टाचार समोर येईल का ? अक्षा एक ना अनेक प्रश्नांची चर्चा मात्र शहरात सुरु आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या