Wednesday, April 24, 2024
Homeनगर‘त्या’ अंत्यसंस्काराची चौकशी करू

‘त्या’ अंत्यसंस्काराची चौकशी करू

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

तीनदा खासदार, राज्यमंत्री असलेले स्व. दिलीप गांधी यांच्यावर शासकीय इतमात अंत्यसंस्कार न झाल्या प्रकरणाची चौकशी केली जाईल, अशी माहिती राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली.

- Advertisement -

मंत्री तनपुरे यांनी काल रविवारी गांधी कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी अ‍ॅड. अभिषेक भगत यांनी स्व. गांधींवर शासकीय इतमात अंत्यसंस्कार न झाल्याकडे मंत्री तनपुरे यांचे लक्ष वेधले. त्यावर चौकशी करणार असल्याचे मंत्री तनपुरे म्हणाले.

गांधी-तनपुरे कुटुंबियांचे जिव्हाळ्याचे संबंध होत असे सांगत भाजपचे जेष्ठ नेते स्व. गांधी यांनी खासदार म्हणून खूप चांगले काम करत नगर जिल्ह्याच्या विकासात भर घातली, अशा शब्दात राज्यमंत्री तनपुरे यांनी स्व. गांधी यांना श्रद्धांजली वाहिली.

मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सुवेंद्र गांधी यांच्याशी संवाद साधला. राष्ट्रवादीचे जेष्ठनेते घन:श्याम शेलार, जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ, रोहिदास कर्डिले, आंबादास गरुडकर यावेळी उपस्थित होते.

विखेंनीही केले सांत्वन

राज्याचे माजी विरोधी पक्षनेते आ. राधाकृष्ण विखे यांनीही गांधी कुटुंबांची भेट घेवून सांत्वन केले. यावेळी त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत गांधी यांनी गल्ली ते दिल्ली केलेल्या कामांचे कौतुक केले. यावेळी शहर अध्यक्ष महेंद्र गंधे उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या