Wednesday, April 24, 2024
Homeनगर2500 रेमेडिसिवीर इंजेक्शन उपलब्ध, 9500 इंजेक्शनचे आगाऊ पैसे भरले

2500 रेमेडिसिवीर इंजेक्शन उपलब्ध, 9500 इंजेक्शनचे आगाऊ पैसे भरले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

करोनावर उपचार घेणार्‍या रुग्णांना रेमेडिसिवर इंजेक्शनची कमरता भासून नयेत,

- Advertisement -

यासाठी अन्न आणि औषध प्रशासन विभाग दक्ष आहे. जिल्ह्यात सध्या 2 हजार 500 इंजेक्शनचा साठा असून पुणे, बेंगलोर आाणि हैद्राबाद येथील कंपन्यांकडे 9 हजार 500 इंजेक्शनचे अगाऊ पैसे भरलेले आहेत. त्यानूसार साधारणपणे दररोज 1 ते 1500 इंजेक्शन उपलब्ध होत असल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली.

दरम्यान, अन्न आणि औषध विभागाने जिल्ह्यातील रेमेडिसिवर इंजेक्शन साठ्याचे नियोजन केले आहे. नगर शहरातील 17 औषधांच्या ऐजन्सी, फार्मा, मोठ्या हॉस्पिटलचे मेडिकल स्टोअर्स यांच्या तर केडगावमधील 2 मेडिकलकडे, संगमनेरमधील 10, श्रीरामपूरमधील 3, कोपरगावमधील 10, प्रवरा नगरमध्ये 1 तर शेवगाव आणि जामखेडमध्ये प्रत्येकी 1 एका ठिकाणी रेमेडिसिवर इंजेक्शनसाठा उपलब्ध असल्याची यादी अन्न- औषधकडून देण्यात आली आहे.

जिल्ह्यात गुरूवारी पुण्यावरून 700 आणि अन्य ठिकाणावरून 1 हजार 200 इंजेक्शन प्राप्त झालेले होते. त्याचे जिल्ह्यातील 45 ठिकाणी वितरण करण्यात आले आहे. जिल्ह्यात साधारणपणे दररोज 1 हजार 1500 इंजेक्शन प्राप्त होत असून त्यानूसार नियोजन करण्यात येत असल्याचे अन्न-औषधचे आयुक्त अशोक राठोड यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या