Saturday, April 27, 2024
Homeजळगावन्यूयॉर्क फॅशनसाठी ‘आयएनआयएफडी’ची भरारी

न्यूयॉर्क फॅशनसाठी ‘आयएनआयएफडी’ची भरारी

जळगाव । jalgaon प्रतिनिधी

इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन डिझाईन (International Institute of Fashion Design) जळगाव येथील विद्यार्थिनींना आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःचे कौशल्य दाखवण्याची संधी मिळाली. जगप्रसिद्ध न्यूयॉर्क फॅशन – 2022 (New York Fashion – 2022) मध्ये आयएनआयएफडी मध्ये शिक्षण घेणार्‍या अश्विनी सोनार, कल्याणी देशमुख, भुवनेश्वरी करंकाल, अनम खान, रेश्मा तायडे या पाच विद्यार्थिनींची निवड करण्यात आली.

- Advertisement -

न्यूयॉर्क फॅशन विकचे (New York Fashion Week) सन 1943 पासून आयोजन केले जाते. हा शो दरवर्षी फेब्रुवारी आणि सप्टेंबर मध्ये आयोजित करण्यात येतो. देश – विदेशातील विद्यार्थ्यांनी या शोमध्ये सहभागी होतात. न्युयॉर्क फॅशन विक (New York Fashion Week) हा 11 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी दरम्यान पार पडला. या शो साठी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या थिम्स वर प्रोजेक्ट देण्यात आले होते.

क्राफ्टस्मनशिप ऑफ द फीचर या थिमनुसार रिसर्च करून विद्यार्थ्यांनी जवळजवळ एक महिना मेहनत घेतली. या कालावधीत विद्यार्थ्यांनी स्केचेस, कलर्स, फॅब्रिक, क्राफ्ट्स, पॅटर्न मेकिंग, ड्रेपिंग, प्रोटोटाईप, गारमेंट कन्स्ट्रक्शन अशा वेगवेगळ्या प्रक्रियेतून काम केले.यासाठी विद्यार्थ्यांना इन्स्टिट्यूटच्या संचालिका संगीता पाटील, फॅशन डिझायनिंग फॅकल्टी अजय परमार, लंडन फॅशन स्कूलच्या फॅकल्टी जिंटारे जॉनक्यूनी यांचे मार्गदर्शन लाभले .तसेच वैशाली पाटील आणि रंजना महाजन यांचेही सहकार्य लाभले. या निवडीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या