Friday, April 26, 2024
Homeनगररस्त्याच्या वादातून अमानुष मारहाण

रस्त्याच्या वादातून अमानुष मारहाण

शिर्डी (प्रतिनिधी) –

रस्त्याच्या जाण्यायेण्याच्या कारणावरून झालेल्या अमानुष मारहाण प्रकरणी पोहेगाव नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष नितीन भानुदास औताडे यांच्यासह

- Advertisement -

त्यांचा मुलगा ऋत्विक औताडे, पोहेगावचे सरपंच अमोल भाऊसाहेब औताडे, तुषार भानुदास औताडे या चौघांवर शिर्डी शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहे. दरम्यान या प्रकरणी परपस्पर विरोधी फिर्यादी दाखल झाल्या आहेत.

याबाबत नानासाहेब माधवराव औताडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. 12 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास मी हॉटेलवर असताना लहान भाऊ किरण याचा फोन आला. तू ताबडतोब जय किसान पेट्रोल पंपाजवळ ये, मी त्या ठिकाणी गेलो असतात माझा भाऊ व वडील यांना नितीन भानुदास औताडे व ऋत्विक नितीन औताडे शिवीगाळ करून दमदाटी करत होते.

त्यावेळी सरपंच अमोल भाऊसाहेब औताडे व तुषार भानुदास औताडे आले त्यांनी आम्हाला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. शिवीगाळ करू नको असे म्हणालो असता ऋत्विक औताडे याने त्याच्या हातातील फायटर ने माझ्या डोक्यात डाव्या कानाच्या वरती मारले. अमोल औताडे याने किरण याच्या डाव्या मांडीला चावा घेतला व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

त्यावेळी नितीन औताडे यांनी लाकडी दांड्याने माझ्या उजव्या हातावर मारहाण केली. त्यात माझा हात मोडला आहे. तसेच तुषार औताडे याने माझ्या वडिलांचे पायावर लाकडी दांडक्याने मारहाण करून वाईट शिवीगाळ केली. जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यावेळी आई मंदाबाई माधवराव औताडे आम्हाला सोडवण्यासाठी आली असता नितीन औताडे यांनी तिला वाईट शिवीगाळ करून ढकलून दिले. त्यामुळे माझी आई मंदाबाई औताडे हिचा दात तुटला.

नानासाहेब माधवराव औताडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिर्डी पोलिसांनी आरोपी नितीन भानुदास औताडे यांच्यासह त्यांचा मुलगा ऋत्विक नितीन औताडे, अमोल भाऊसाहेब औताडे, तुषार भानुदास औताडे अशा चौघांवर गुन्हा रजिस्टर नंबर-। 66/2021 भादवि कलम-325, 324, 323, 504, 506, 34 प्रमाणे शिर्डी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यात वाढीव कलम 326 दाखल करण्यात आले आहे. वरील चारही आरोपीना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

दरम्यान ऋत्विक औताडे यांनी दुसरी फिर्याद दाखल केली असून त्यात म्हटले आहे, दोन महिन्यापूर्वी नानासाहेब माधव औताडे यांनी चुलते सरपंच अमोल भाऊसाहेब औताडे यांना ग्रामपंचायत मधील दारू बंदीच्या मिटिंगमध्ये मारहाण करून जिवे ठार मारण्याची धमकी दिली होती. तसेच दि. 11 फेब्रुवारी रोजी सकाळी 10/15 वा. सुमारास पोहेगाव येथील साई किसान विकास केंद्र याठिकाणी माझ्या ऑफीसला मोटारसायकल वरून जात असताना पंपाजवळील गाळ्या जवळ किरण माधव औताडे यांनी त्याची मोटारसायकल आडवी लावली व मला शिवीगाळ करून मारहाण केली.

त्याठिकाणी किरण औताडे, नानासाहेब औताडे, माधव औताडे, मंदाबाई औताडे यांनी शिवीगाळ करून लाथाबुक्याने मारहाण केली. त्याचवेळी चूलते अमोल औताडे हे त्याठिकाणी आले असता नानासाहेब औताडे व किरण औताडे यांनी चुलते यांना शिवीगाळ करून मारहाण केली. त्यावेळी नानासाहेब औताडे यांनी त्याच्या खिशातील चाकु काढुन चुलते अमोल औताडे औताडे यांच्या डाव्या हातावर वार केला. याबाबत भादवि कलम 341, 324, 506, 504,34 प्रमाणे गुन्हा शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या