Thursday, April 25, 2024
Homeब्लॉगBlog : इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केल्याने होतात अनेक फायदे; ते कसे...

Blog : इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केल्याने होतात अनेक फायदे; ते कसे जाणून घ्या

आर्थिक वर्ष २०१९-२० (कर निर्धारण वर्ष २०२०-२१) करीता इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत आहे. आपण करदाते असो अथवा नसो जी व्यक्ती नियमित आपले इन्कम टॅक्स रिटर्न भरत आहे अथवा नव्याने भरू इच्छिता त्यांच्यासाठी ३१ डिसेंबर ही शेवटची तारीख आहे…

इन्कम टॅक्स रिटर्न का फाईल करायचा..? त्याचे फायदे किंवा महत्व याबाबत लोकांमध्ये अजूनही हवी तितकी साक्षरता नाही.

- Advertisement -

इन्कम टॅक्स रिटर्न फक्त कर भरण्यासाठी असतो असे नसून तुम्ही वर्षभरात काय कमावलंय, किती खर्च केलाय, शिल्लक किती, गुंतवणूक किती अशा सर्व आर्थिक बाबींचा ताळेबंद असतो. आता मागील वर्षीचे रिटर्न भरण्याच्या संधी नाही, फक्त चालू वर्षीचेच रिटर्न भरू शकता.

तुम्ही नोकरी करताय किंवा तुमचा एखादा छोटासा व्यवसाय आहे. वर्षाकाठी तुम्ही २.५० लाखाचं उत्पन्न मिळवताय. हे उत्पन्न करपात्र नाही, म्हणजे तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करणे आवश्यक नाही, पण तेच जर तुम्ही निल म्हणून रिटर्न फाईल केला तर तुमचा त्या वर्षाचा अधिकृत उत्पन्नाचा पुरावा तुमच्या हाती येतो.

कुणी तुमच्या मागील वर्षाच्या उत्पन्नाचा पुरावा मागितला तर तुम्ही फक्त इन्कम टॅक्स रिटर्न दाखवायचा त्यात तुमचे उत्पन्न स्पष्ट होते.

व्यवसायिकांसाठी- तुमचा एखादा व्यवसाय आहे, तो मागच्या ५-६ वर्षांपासून चालू आहे. तुम्ही पुरेसे उत्पन्न हि मिळवताय. पण ते करपात्र नसल्यामुळे तुम्ही आजपर्यंत कधीही इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलेलाच नाही.

आता तुम्हाला व्यवसाय वाढीसाठी कर्ज हवंय, अशा वेळेस तुम्ही बँकेत जाता, त्यांना व्यवसाय वाढीसाठी कर्ज मागता, यात मुद्रा किंवा व्यवसाय कर्ज कोणतेही कर्ज येते, आणि बँक तुम्हाला मागच्या तीन वर्षांचा इन्कम टॅक्स रिटर्न दाखवा म्हणते ते तुमच्याकडे नसते. बँक कर्ज नाकारते.

तुम्ही सांगता ५-६ वर्षांपासून व्यवसाय आहे, वर्षाला २.५० लाख रुपये कमावतोय, पण बँक इन्कम टॅक्स रिटर्न मागते. ते तुमच्याकडे नसते, साहजिकच कर्ज मिळत नाही. आता अशावेळेस बँक कर्ज देत नाही अशी तक्रार करून काय फायदा जर तुम्ही त्यांच्या प्राथमिक कागदपत्रांची पूर्तता करू शकत नाही यात बँकेचाही दोष नाही

तुम्ही खरंच किती उत्पन्न कमावताय हे बँकेला अधिकृतरीत्या दाखविणे आवश्यक असते, तुमच्या तोंडी माहितीवर ते विश्वास ठेवत नाही. तुम्ही किती कमावता हे जोपर्यंत बँकेला माहित होत नाही तोपर्यंत तुम्ही त्यांच्या कर्जाचा परतावा करण्यासाठी सक्षम आहेत की नाही हे कसे कळणार.

तुम्ही नोकरी करताय किंवा आधीच काही व्यवसाय आहे. आणि आता तुम्हाला नवीन व्यवसाय सुरु करायचा आहे. यासाठी कर्ज हवे आहे. अशावेळी मुद्रा कर्ज हा एक पर्याय आहे. पण जर तुमच्याकडे मागच्या तीन वर्षाचा इन्कम टॅक्स रिटर्न नसेल तर बँक तुम्हाला जास्तीत जास्त ५० हजार कर्ज मंजूर करते.

यात तुमचा व्यवसाय सुरु होऊ शकत नसेल तर तुमचा हिरमोड होतो. तेच जर तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न देऊ शकलात. तर १० लाखांपर्यंत कर्ज मंजूर होऊ शकते. कारण तुम्ही काहीतरी उत्पन्न कमवत आहात याचा पुरावा तुम्ही बँकेला दिलेला असतो, म्हणजे आर्थिक दृष्ट्या साक्षर असता आणि अशावेळेस तुम्ही दिलेल्या कर्जाचा योग्य उपयोग करू शकता याची बँकेला खात्री पटते.

तुमचा व्यवसाय ३-४ वर्षांपासून चांगला चालू असेल आणि तुम्ही किमान तीन वर्षांचे इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलेले असतील तर तुम्हाला व्यवसाय वृद्धीसाठी कर्ज देण्यासाठी बँका दारात रांगा लावून उभ्या राहतील.

आपण लगेचच आपल्या आर्थिक सल्लागार ला सांगून कागदपत्रांची जमावाजमव करून लवकरात लवकर रिटर्न भरण्याची तयारी करा. जितक्या लवकर शक्य असेल तितक्या लवकर इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करायला सुरुवात करा.

तुमच उत्पन्न करपात्र उत्पन्न नसेल तर निल रिटर्न फाईल करा. उत्पन्न कमी असेल तर निल रिटर्न फाईल करा, पण फाईल कराच आणि जर तुम्ही थोडाफार कर भरत असाल तर तुमची आर्थिक प्रतिमा उंचवण्याकरीता आणखीच त्याचा फायदा होईल.

योगेश कातकाडे, आर्थिक सल्लागार, नवीन नाशिक

- Advertisment -

ताज्या बातम्या