जायकवाडीत पाण्याची आवक मंदावली ; विसर्गही घटवला

jalgaon-digital
2 Min Read

औरंगाबाद – aurangabad

नाशिक (nashik) परिमंडळात पाऊस (rain) थांबला असल्याने जायकवाडी धरणात (Jayakwadi Dam) येणारा पाण्याचा वेग मंदावला आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने धरणातून होणारा विसर्ग कमी केला आहे. पुढील आठवड्यात मोठ्या पावसाची शक्यता असून त्यानुसार पुढील नियोजन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते.

नाशिक भागातील पाण्याची आवक मंदावली आहे. त्यामुळे जायकवाडी धरणाचे १८ दरवाजे प्रत्येकी २ फूटवरून प्रतिसेकंद ३७ हजार ७२८ क्युसेक्स याप्रमाणे गोदापात्रात जलविसर्ग केला जात आहे. गेल्या २ दिवसांपासून २७ पैकी १८ दरवाजे प्रत्येकी ४ फूटवर करून प्रतिसेकंद तब्बल ७६ हजार क्युसेक्सचा जलप्रवाह गोदावरीत सोडला जात होता. दरम्यान, आज सकाळी नाशिक व नाथसागर जलाशयाच्या पाणलोटातील पाण्याची आवक कमी होऊ लागली. जलसंपदा विभागाच्या जायकवाडी उत्तर येथील प्रशासनाने बदलती पाणी स्थिती पाहता १८ दरवाजे टप्प्याटप्प्याने दिवसभरात २ फूट खाली केले. त्यामुळे आता प्रत्येकी दोन फूट वर केलेल्या १८ दरवाजांतून ३७ हजार ७२८ क्यूसेक्सचा जलप्रवाह गोदावरीत सोडला जात आहे.

परिणामी गोदावरी नदीचा (Godavari River) जलफुगवटाही ओसरला आहे. या पार्श्वभूमीवर मागील २६ दिवसांपासून जायकवाडीचे १८ दरवाजे उघडे असून, अहोरात्र गोदावरीत पाणी सोडण्यात येत आहे. पैठण ते नांदेडपर्यंत सध्या गोदावरी तुडुंब आहे. त्यामुळे धरणात पाण्याची आणखी होणारी संभाव्य आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची कार्यवाही करण्यात येईल. पैठण शहरासह नदीकाठच्या गावांनी सतर्क रहावे. पाण्याजवळची अतिक्रमणे काढून टाकावी. काठावरील झाडांना जनावरांना बांधून ठेवू नये. सावधानता बाळगावी, असे आवाहन जलसंपदा विभागाच्या जायकवाडी उत्तरचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांनी केले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *