लष्करी हद्दीत घुसखोरी करणार्‍या दोघांना अटक

jalgaon-digital
1 Min Read

अहमदनगर| प्रतिनिधी| Ahmednagar

येथील लष्कराच्या हद्दीमध्ये लष्कराचे बनावट ओळखपत्र दाखवत दोन तरुणांनी घुसण्याचा प्रयत्न केला.

त्या दोन तरुणांना अटक करण्यात आली आहे. तुषार ज्ञानेश्‍वर पाटील व सोपान महारु पाटील (रा. कापडने ता. जि. धुळे) अशी अटक केलेल्या तरुणांची नावे आहेत. या दोघांना न्यायालयाने चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी एसीसी सेंटरचे नायब रसलदार सतराम सिंह यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

तुषार व सोपान हे दोघे नगर येथील लष्कराची हद्द असणार्‍या बीटीआर परिसरात दुपारच्या सुमारास दुचाकीवरून चालले होते. यावेळी त्यांना गेटवर असलेल्या जवानाने अडवले. या दोघांकडे चौकशी केल्यावर त्यांच्याकडे लष्कराच्या असलेले ओळखपत्र बनावट निघाले.

या दोघांना भिंगार कॅम्प पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. लष्कराच्या हद्दीत घुसण्याचा नेमका उद्देश काय होता? याबाबत या दोघांकडे पोलीस चौकशी करीत आहेत. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भैय्यासाहेब देशमुख करीत आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *