Thursday, April 25, 2024
Homeनाशिकनिकृष्ट रस्ता कामाची चौकशी; उपोषण स्थगित

निकृष्ट रस्ता कामाची चौकशी; उपोषण स्थगित

नांदगाव । Nandgaon (प्रतिनिधी)

नांदगाव-औरंगाबाद हायवे ते माणिकपुंज या रस्त्याच्या निकृष्ट कामाची चौकशी करण्यासाठी आम आदमी पार्टीचे उपजिल्हाध्यक्ष विशाल वडघुले यांनी आजपासून सुरू केलेले उपोषण तहसीलदार उदय कुलकर्णी यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर स्थगित करण्यात आले.

- Advertisement -

नांदगाव-औरंगाबाद हायवे ते माणिकपुंज येथील खोडके वस्ती, दरेकर वस्ती, ठाकर वस्ती यामार्गे धरणावरून गावाकडे जाणार्‍या रस्त्याचे काम हे निकृष्ट दर्जाचे होत असून या कामाची चौकशी करून संबंधित ठेकेदारावर कारवाई होण्यासाठी विविध कार्यालयात पाठपुरावा केला होता. परंतू कारवाई न झाल्याने उपोषणाचा वडघुले यांनी निर्णय घेतला होता.

तहसीलदार उदय कुलकर्णी यांनी संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांची बैठक घेवून हा प्रश्न मार्गी लावण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिले.

- Advertisment -

ताज्या बातम्या