Thursday, April 25, 2024
Homeनाशिकड्रेनेज चेंबर कामात निकृष्ट साहित्य

ड्रेनेज चेंबर कामात निकृष्ट साहित्य

सिन्नर । वार्ताहर Sinnar

नगरपरिषदेने (nagar parishad) ड्रेनेज चेंबर (Drainage chamber) बनविण्यासाठी नेमलेल्या ठेकेदाराने (Contractor) कामात दुय्यम दर्जाच्या विटा वापरून फसवणूक केली आहे.

- Advertisement -

निकृष्ट दर्जाचे बांधकाम (Poor quality construction) उपयोगी सामान वापरल्यामुळे संबंधित ठेकेदाराची चौकशी करून ठेका रद्द करण्याची मागणी मनसेनेच्या (MNS) करण्यात आली. सदर घटनेबाबत मनसेनेच्या वतीने मुख्याधिकारी संजय केदार (Chief Officer Sanjay Kedar), तहसीलदार राहुल कोताडे (Tehsildar Rahul Kotade) यांच्या निदर्शनास आणून देत निवेदन (memorandum) देण्यात आले.

शहरातील डुबेरे नाका परिसरातील हेरंब हाऊसिंग सोसायटी, शिक्षक कॉलनी येथे चालू असलेले भूमिगत गटार व चेंबरसाठी वापरलेल्या विटा या अतिशय निकृष्ट दर्जाच्या असल्याचे समजल्यानंतर मनसेच्या महिला आघाडी तालुकाध्यक्ष अ‍ॅड. भाग्यश्री ओझा, गणेश मुत्रक, लखन खर्डे, सचिन ओझा यांच्यासह मनसैनिकांनी या ठिकाणी भेट देत पाहणी केली.

बांधकामाच्या विटा (Construction bricks) अगदी हाताने तुटत आहेत. त्यांचा चुरा होत असल्याचे लक्षात आल्यानंतर ओझा यांनी चौकशी केली असता ठेकेदाराकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. ठेकेदाराच्या कामाची चौकशी करावी व त्याला काळ्या यादीत टाकण्यात यावे अथवा मनसेना स्टाईल आंदोलन (agitation) छेडले जाईल असा इशारा अ‍ॅड. ओझा यांनी निवेदनात दिला. यावेळी तुषार कपोते, सचिन भगत यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

वृक्षतोड थांबवावी

दरम्यान हेरंब सोसायटीमध्ये एका घराच्या कोपर्‍याला पंचवीस वर्षाचे औदुंबराचे झाड होते. गटारीच्या कामात अडथळा होत असल्याचे कारण देत ठेकेदाराने ते झाड तोडले. एकीकडे नगरपरिषदेकडून माझी वसुंधरा अभियानाचे मोठमोठे बोर्ड लावून अवास्तव खर्च केला जात असून दुसरीकडे कोणतेही कारण नसताना वृक्षतोड केली जात असल्याबद्दल मनसेने नाराजी व्यक्त केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या