Friday, April 26, 2024
Homeनगररेशनधारकांना वाटपासाठी आले निकृष्ट धान्य

रेशनधारकांना वाटपासाठी आले निकृष्ट धान्य

सलाबतपूर l वार्ताहर l Salabatpur

नेवासा तालुक्यातील सलाबतपूर येथील रेशन दुकानात नित्कृष्ट दर्जाचे धान्य आले असल्याने रेशन धारकांचा रेशनमध्ये धान्य घेण्यास नकार मिळत आहे.

- Advertisement -

रेशन दुकानदार व पुरवठा विभागाकडून गोरगरीबांची थट्टा केली जात असल्याने संताप व्यक्त होत आहे.

सलाबतपूर येथील रेशन दुकानाबाबत कायमच नित्कृष्ट धान्य साठ्याच्या तक्रारी असतात. मात्र रेशन दुकानदार याबाबत फारशी दखल घेताना कधीच दिसत नाही.

सर्व केसरी शिधापत्रक धारकांना स्वस्त धान्य मिळावे; नगर शहर काँग्रेसची मागणी

सध्या या रेशन दुकानात गहु तांदुळ तसेच ज्वारी असे धान्य विक्रीसाठी असून एका व्यक्तिला दोन किलो तांदूळ एक किलो गहू तर दोन किलो ज्वारी दिली जाते.

मात्र गहु, ज्वारी खराब आहे. निम्यापेक्षा जास्त घाण आळी किडे त्यामध्ये निघतात. त्यामुळे रेशन धारकांना हे धान्य घरी नेऊन करायचे काय?, जनावरे तरी खातील का? असा प्रश्न पडला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या