Thursday, April 25, 2024
Homeनगरबेलपिंपळगावातील दीड कोटीचे पेयजल योजना काम निकृष्ट

बेलपिंपळगावातील दीड कोटीचे पेयजल योजना काम निकृष्ट

बेलपिंपळगाव |वार्ताहर| Belpimpalgav

नेवासा (Newasa) तालुक्यातील बेलपिंपळगाव (Belpimpalgav) येथे चार वर्षांपासून काम सुरू असलेली दीड कोटी रुपये खर्चाची मुख्यमंत्री पेयजल योजना (CM Peyjal Yojana) ही इस्टिमेटनुसार झाली नसून काम संपूर्णपणे बोगस (work is totally Inferior) झाल्याची बेलपिंपळगाव ग्रामपंचायतीच्यावतीने तक्रार (Complaint on Belpimpalgaon Grampanchayat) दाखल करण्यात आली असून यासंदर्भात जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम समिती सभापती सुनील गडाख (Zilla Parishad Finance and Construction Committee Chairman Sunil Gadakh) यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली. त्यांनी अधिकार्‍यांना आदेश दिल्यानंतर अधिकार्‍यांनी नुकतीच येथे भेट देऊन कामाची पाहणी केली.

- Advertisement -

याबाबत माहिती अशी की, बेलपिंपळगावातील सर्व वाडी, वस्ती, गावठाण यांना शुद्ध पाणी पुरवठा व्हावा म्हणून शासनाने दीड कोटी रुपये खर्च करून ही मुख्यमंत्री पेयजल योजना मंजूर (CM approves drinking water scheme) केली होती पण ठेकेदार व अधिकारी यांनी कामात हलगर्जीपणा (Contractor Negligence) केल्याचा त्यांच्यावर आरोप (Allegations) होत आहे. अनेक वाड्या-वस्त्यांना अजूनही पाणीपुरवठा होत नाही. या पाईपलाईनवर जे कंट्रोल वॉल आहेत ते गटारात काढले आहे. पाऊस पडला की त्या ठिकाणी पूर्णपणे गटार तयार होते त्यामुळे तेथे काम होत नाही ते वॉल काढून दुसरीकडे बसण्याची गरज आहे ,

रस्त्याच्या बाजूने या जलवाहिन्या (पाईप) टाकायला पाहिजे होत्या पण काही अधिकारी यांना हाताशी धरून ठेकेदार याने ही जलवाहिनी शेतकर्‍यांच्या शेतातून नेली आहे. भविष्यात शेततळे करताना या योजनेला अडथळे येऊ शकतात. त्यामुळे रस्त्याच्याकडेने जलवाहिनी गरजेची होती. कामासाठी उच्च दर्जाचे पाईप वापरले नसल्याचा ग्रामपंचायतीचा आरोप आहे. काढलेल्या वॉलसाठी चेंबर केले नाही आणि ज्याठिकाणी केले त्यांना ढापे नाहीत. ज्या वाडी वस्तीवर 50 ते 60 लोक राहतात त्या वस्तीला पाईपलाईन गेलेली नाही पण मात्र एक-दोन कुटुंंबासाठी मात्र 2 किमी अंतरावर पाईपलाईन गरज नसताना नेली.

संबंधित ठेकेदार याने या कामावरील अधिकारी यांना हाताशी धरून निकृष्ट दर्जाचे काम केले व अपूर्ण काम असताना देखील या योजनेचे 1 कोटी 42 लाख रुपये च काम असताना अपूर्ण काम झाले तरी देखील या कामाचे फक्त 5 लाख रुपये मागे असल्याने ठेकेदार आता कामात कुचराई करत असल्याने ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य यांनी जिल्हा परिषदेमध्ये अर्थ व बांधकाम सभापती सुनील गडाख (sunil Gadakh) यांना भेटून हे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे सांगितले असता त्यांनी लगेच याठिकाणी जिल्हा परिषद पाणीपुरवठा मुख्य कार्यकारी अभियंता खताळ व पंचायत समिती पाणीपुरवठा उप अभियंता कराळे (Water Supply Deputy Engineer Karale) यांना आदेश दिले असता यांनी या कामाची पाहणी केली व यात ठेकेदाराला हे काम दुरुस्त करून देण्याचे आदेश दिले आहे. जर लवकरात लवकर हे काम पूर्ण व इस्टिमेटनुसार करून नाही दिले तर संबंधित अधिकारी व ठेकेदार (contractor) यांच्यावर ग्रामपंचायत प्रशासनाच्यावतीने गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या