अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
नगर जिल्ह्यासह राज्यात अपात्र रेशनकार्ड शोध मोहीम सुरू होती. पण त्यास प्रशासकीय कारणास्तव पुढील
आदेशापर्यंत स्थगित करण्यात येत असल्याचे परिपत्रक अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने जारी केले आहे.
सार्वजनिक वितरण व्यवस्था (नियंत्रण) आदेश, 2015 मधील तरतुदीनुसार शिधापत्रिका तपासणी ही निरंतर प्रक्रिया आहे. त्यामुळे अपात्र शिधापत्रिका शोधून रद्द करण्याकरीता खास शोध मोहीम राबविणे आवश्यक असल्याने. राज्यातील कार्यरत बी.पी.एल., अंत्योदय, अन्नपूर्णा, केशरी शुभ्र व आस्थापना कार्ड या सर्व प्रकारच्या शिधापत्रिकांची तपासणी करणेसाठी शोध मोहीम 1 फेब्रुवारी 2021 ते दि. 30 एप्रिल 2021 या कालावधीमध्ये राबविण्याबाबतच्या सूचना अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागा कडून संबंधित कार्यालयास सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार पुरवठा विभाग, रेशनदुकानदारांनी कार्यवाही सुरू केली होती. याबाबतचे फॉर्म रेशनदुकानदार भरूनही घेत होते. त्यासाठी लागणारी कागदपत्रांची पूर्तताही करण्यात येत होती. पण आता ही मोहिम स्थगित करण्यात आली आहे.