Thursday, April 25, 2024
Homeनगरश्रीगोंदा : अपात्र नगरसेवक खेंडकेच्या प्रभागात पोटनिवडणूक

श्रीगोंदा : अपात्र नगरसेवक खेंडकेच्या प्रभागात पोटनिवडणूक

श्रीगोंदा |प्रतिनिधी| Shrigonda

श्रीगोंदा नगरपालिकेची निवडणूक दीड वर्षांपूर्वी झाली. यात बहुमत भाजपचे तर नगराध्यक्ष आघाडीचे निवडुन आले.

- Advertisement -

भाजपचे नगरसेवक अशोक खेंडके हे उपनगराध्यक्ष झाले होते. मात्र त्यांनी पालिकेची परवानगी न घेता बांधकाम केल्याने त्यांना अपात्र ठरवण्यात आले होते. याबाबत मंत्रालयात देखील सुनावणी झाली असली तरी आता राज्य निवडणूक आयोगाने या प्रभाग क्रमांक ६ ब च्या पोटनिवडणुकीसाठी मतदार यादी कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

श्रीगोंदा नगरपालिकेत भाजपचे १० आणि काँग्रेस ,राष्ट्रवादी आघाडीचे नऊ नगरसेवक असून नगराध्यक्ष आघाडी आहेत. उपनगराध्यक्ष पद भाजपकडे आहे. दीड वर्ष पूर्वी पालिका निवडणूक झाली आहे.

मात्र माजी उपनगराध्यक्ष असलेले आसाराम उर्फ अशोक गुलाब खेंडके यांच्या विरोधात विनापरवाना बांधकाम केले प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आला. खेंडके यांच्या विरोधात जिल्हाधिकारी यांनी निकाल निकाल दिला. यानंतर मंत्रालयात देखील दिलासा मिळाला नाही.या दरम्यान राज्यातील पोटनिवडणूक बाबत मतदार यादी कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

राज्य निवडणूक आयोगाने निर्गमित केलेला मतदार यादीचा कार्यक्रम राबविण्यात यावा असे श्रीगोंदा पालिकेला दिलेल्या पत्रात म्हंटले आहे.

याबाबतचे अहवाल मागवला आहे. आता अपात्र झालेले भाजपा नगरसेवक अशोक खेंडके यांना दिलासा मिळण्यासाठी न्यायालयाच्या आदेशाची वाट पहावी लागणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या