Saturday, April 27, 2024
Homeनंदुरबारकेंद्रीय आरोग्यमंत्री डॉ.मांडवीया यांची नवापूरच्या औद्योगिक वसाहतीला भेट

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ.मांडवीया यांची नवापूरच्या औद्योगिक वसाहतीला भेट

नवापूर | श.प्र.- NAVAPUR

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ.मनसुखभाई मांडवीया (Health Minister Dr. Mansukhbhai Mandviya) यांनी नवापूरलगत असलेल्या औद्योगिक (midc) एमआयडीसीसह विविध प्रकल्पांना भेट देऊन पाहणी केली. याप्रसंगी वसाहतीतील उद्योजकांनी विविध समस्यांचे त्यांना दिले.

- Advertisement -

नवापूर शहरात भारतीय जनता पाटीचे केंद्रीय आरोग्य आणि कुटूंंब कल्याण व रसायन मंत्री डॉ.मनसुख मांडवीया हे दोन दिवसीय जिल्हा दौर्‍यावर आले आहेत. आज सकाळी ९ वाजता गुजरात राज्यातील सुरत येथून नवापूर शहरातील शासकीय विश्रामगृह येथे त्यांचे सकाळी ९ वाजता आगमन झाले.

यावेळी नवापूर तालुका व शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. सर्व प्रथम खा.डॉ.हिना गावीत व आ.डॉ.विजयकुमार गावीत, जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, तालुका अध्यक्ष भरत गावीत, अल्पसंख्याक मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष एजाज शेख,

जिल्हासरचिटणीस राजेंद्र गावीत, तालुका सरचिटणीस जयंतीलाल अग्रवाल, अजय गावीत, जितेंद्र अहिरे, जाकीर पठाण, ओबीसी मोर्चा जिल्हाउपाध्यक्ष हेमंत जाधव, शहराध्यक्ष प्रणव सोनार, स्वप्नील मिस्त्री, नगरसेवक महेंद्र दुसाने, सोशल मिडीया प्रदेश सदस्य निलेश प्रजापत,

शहर प्रभारी रमला राणा, पं.स.सदस्य सुमन गावीत, आयुब गावीत, जोहुरखान पठाण, तोसिफ मन्सुरी, कृणाल दुसाने, माजी उपनगराध्यक्ष शैला टिभे, माजी नगरसेविका सुनिता वसावे, शहराध्यक्ष जिग्नेशा राणा, दुर्गा वसावे, शरीफ बागवान, वेल्जी गावीत, हेमंत शर्मा,

गोपी सैन, सौरव भामरे, शंभु सोनार, घनशाम परमार, सैफ व्होरा, शंकर दर्जी, नरेश नाईक, सविता जयस्वाल, शाहरुक खाटीक, संजाद बदुडा, भिमसिंग पाडवी, संदिप अग्रवाल, तनुज अग्रवाल, रामसिंग राजपूत, मोहीत अग्रवाल, जीवन वळवी आदीनी केंद्रीय मंत्री डॉ.मनसुख मांडवीया यांचा सत्कार केला.

यानंतर केंद्रीय मंत्री मांडवीया यांनी नवापूरलगत असलेल्या औद्योगिक वसाहत एमआयडीसीसह विविध प्रकल्पांना भेट देऊन पाहणी केली. याप्रसंगी वसाहतीला उद्योजकांनी विविध समस्यांचे निवेदन केंद्रीय मंत्री मांडवीया यांना दिले.

याप्रसंगी भाजपा तर्फे आदिवासी परंपरागत नृत्य सादर करुन आदिवासी महिलांनी आदिवासी भागातील प्रसिध्द असे शिबली नृत्य सादर केले. सदर नृत्य बघून भरवलेल्या मंत्री महोदयांनी सदर शिबली आपल्या डोक्यावर घेऊन नृत्य केले. यानंतर केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीया यांनी नंदुरबारकडे प्रस्थान केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या