Monday, April 29, 2024
Homeदेश विदेशRepublic Day 2021 : रक्त गोठतं अशा ठिकाणी आपल्या 'हिमवीरां'नी फडकावला तिरंगा,...

Republic Day 2021 : रक्त गोठतं अशा ठिकाणी आपल्या ‘हिमवीरां’नी फडकावला तिरंगा, पाहा व्हिडिओ

दिल्ली l Delhi

आज देशाच्या कानाकोपऱ्यात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे. लहानापासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकजण सहभागी होत आहे. यामध्ये बर्फाच्छादित प्रदेशात आपल्या देशाचे संरक्षण करणारे जवानही मागे नाहीत.

- Advertisement -

लडाखमध्ये उणे २० अंश सेल्सिअस इतक्या कमी वातावरणातही हिमवीरांनी आपला तिरंगा फडकावला आहे. लडाखमध्ये १७००० फूट उंचीवर आयटीबीपी अर्थात इंडो तिबेटन पोलीसांच्या तुकडीतील जवानांनी आज सकाळी मोठ्या उत्साहात ध्वजारोहण केलं.

आयटीबीपीच्या महिला आणि पुरुष जवानांनी बर्फाळ शिखरांवर तिरंगा डौलाने फडकवला. यावेळी जवानांचा कधीही न मावळणारा उत्साह पाहायला मिळाला. हिमवीर म्हणून सैन्यदलात ओळखल्या जाणाऱ्या या तुकडीने ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम’चा घोषही यावेळी केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या