Thursday, April 25, 2024
Homeनाशिकओळख पटवून दुचाकी घेऊन जा! इंदिरानगर पोलिसांचे आवाहन

ओळख पटवून दुचाकी घेऊन जा! इंदिरानगर पोलिसांचे आवाहन

इंदिरानगर | वार्ताहर

पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेवारस स्थितीत सापडलेल्या तसेच विविध गुन्ह्यात जप्त केलेल्या अशा सोळा बेवारस दुचाकी मालकांनी आठ दिवसाच्या आत ओळख पटवून घेऊन जावीत असे आवाहन इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर यांनी केले आहे…

- Advertisement -

अनेक वर्षापासूनपोलीस ठाण्याच्या आवारात पडून असलेल्या बेवारस विविध गुन्ह्यातील सोळा दुचाकी वाहने त्याच्या मालकांनी कागदपत्रसह ओळख पटवून घेऊन जावीत अन्यथा योग्य ती सरकारी नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल असे पोलिस ठाण्यात तर्फे सांगण्यात आले आहे.

न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होत नसल्याने तसेच वाहनांचे मूळ मालक सापडत नसल्याने बकाल अवस्थेतील वाहनांमुळे पोलीस ठाण्याच्या आवारात अतिशय खराब झाल्याचे चित्र दिसत होते.

त्यामुळे वरिष्ठांचे आदेशाने अश्या दुचाकीची ओळख पटवून घेऊन जावे असे आवाहन करण्यात आले आहे सदरच्या दुचाकी वाहने ही नादुरुस्त व जुनाट तुटपुट झालेल्या अवस्थेत आहेत काहींचे इंजन व चेसिस नंबर न दिसणारे आहेत.

कोम्बिंग ऑपरेशन ,नाकाबंदी ,वाहन चेकिंग मध्ये आम्ही 16 दुचाकी वाहने जप्त केली आहेत. वरिष्ठांच्या आदेशानुसार सदरची वाहने आम्ही मूळ मालकांना परत करत आहोत वाहनांची योग्य ती कागदपत्र घेऊन मुळ मालकानी आपली वाहने घेऊन जावेत

निलेश माईनकर, वपोनि इंदिरानगर पोलीस ठाणे

- Advertisment -

ताज्या बातम्या