Saturday, April 27, 2024
Homeदेश विदेशभारतीय लष्करात 'या' स्वदेशी ड्रोन'चा समावेश

भारतीय लष्करात ‘या’ स्वदेशी ड्रोन’चा समावेश

दिल्ली | Delhi

भारत आणि चीन यांच्यात सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर डीआरडीओ (DRDO) या संस्थेने भारतीय लष्कराला पूर्ण स्वदेशी बनावटीचे ड्रोन दिले आहे. या ड्रोनला “भारत”(BHARAT) असे नाव देण्यात आले आहे. अशी माहिती ANI या वृत्तसंस्थेने दिली आहे.

- Advertisement -

लडाखजवळील भारत व चीन यांच्यातील नियंत्रण रेषेवर हे ड्रोन्स उंच भागात आणि डोंगराळ भागात अचूक पाळत करू शकतात. डीआरडीओच्या अधिकाऱ्यांनी बोलताना सांगितले, “लडाख भागात सुरू असलेल्या वादाचा विचार करता भारतीय लष्कराला अचूक पाळत ठेवण्यासाठी ड्रोनची आवश्यकता होती. ही गरज भागवण्यासाठी डीआरडीओने लष्कराला ‘भारत’ ड्रोन उपलब्ध करून दिले आहेत. हे ड्रोन डीआरडीओच्या चंदीगड येथील प्रयोगशाळेने विकसित करण्यात आले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या