भारतीय शुगर इंडस्ट्रीजचा वुमेन आयकॉन पुरस्कार अनुराधा नागवडे यांना जाहीर

jalgaon-digital
1 Min Read

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda

परभणी जिल्ह्यातील श्री लक्ष्मीनरसिंह शुगर्स एल.एल.पी. अमडापूर या कारखान्याच्या चेअरमन व अहमदनगर जिल्हा बँकेच्या संचालिका अनुराधा नागवडे यांना भारतीय शुगर इंडस्ट्रीजचा वुमेन आयकॉन पुरस्कार जाहीर झाला आहे.

बुधवारी (दि.7) पुणे येथे माजी मंत्री प्रकाश आवाडे, साखर आयुक्त शेखर गायकवाड, भारतीय विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शिवाजीराव कदम, राज्य साखर संघाचे संचालक राजेंद्र नागवडे, भारत सरकारच्या पंचायतराज मंत्रालयाचे सहसेक्रेटरी संजीब पटजोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती भारतीय शुगरचे अध्यक्ष विक्रमसिंह शिंदे व उपाध्यक्ष डी. एम. रासकर यांनी दिली आहे.

अनुराधा नागवडे यांनी परभणी येथील बंद पडलेला त्रिधारा शुगर, अमडापूर हा 2 हजार 500 मे.टन क्षमतेचा खाजगी साखर कारखाना विकत घेऊन त्याचे श्रीलक्ष्मीनरसिंह शुगर्स असे नामकरण केले. गेल्या पाच वर्षामध्ये यशस्वीरित्या गाळप करून कारखाना परिसरातील शेतकर्‍यांना योग्यप्रकारे न्याय दिलेला आहे. सन 2021-22 मध्ये या कारखान्याने 6 लाख 31 हजार 310 मे.टन गाळप केले आहे.

नागवडे यांनी साखर उद्योगात दिलेले महत्त्वपूर्ण योगदान व त्या माध्यमातून कारखाना परिसराचा झालेला सर्वांगीण विकास, कामगारांचे मार्गी लागलेले प्रश्न यामुळे त्यांना भारतीय शुगरतर्फे वुमन आयकॉन ऑफ इंडियन शुगर इंडस्ट्री अवार्ड जाहीर झाला आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *