Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशभारताची 'हनुमान उडी'! Aditya L1 सूर्याच्या दिशेने झेपावलं, पाहा VIDEO

भारताची ‘हनुमान उडी’! Aditya L1 सूर्याच्या दिशेने झेपावलं, पाहा VIDEO

दिल्ली | Delhi

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान-3 च्या यशस्वी लँडिंगनंतर, इस्रोने शनिवारी सूर्याचा अभ्यास करण्यासाठी आपली पहिली मोहीम पाठवली. आदित्य L1 नावाची ही मोहीम PSLV-C57 च्या XL आवृत्ती रॉकेटचा वापर करून श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून सकाळी 11.50 वाजता प्रक्षेपित करण्यात आली. PSLV हे चार टप्प्यातील रॉकेट आहे.

- Advertisement -

रॉकेट आदित्य L1 ला 235 x 19500 किमीच्या कक्षेत प्रक्षेपित करेल. यासाठी 63 मिनिटे 19 सेकंद लागतील. हे अंतराळयान लगरेंज पॉइंट-1 (L1) वर सुमारे 4 महिन्यांनंतर पोहोचेल. या बिंदूवर ग्रहणाचा प्रभाव पडत नाही, त्यामुळे सूर्याचा अभ्यास येथून सहज करता येतो. या मोहिमेचा अंदाजे खर्च 378 कोटी रुपये आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या