Sunday, April 28, 2024
Homeक्रीडाभारताला धक्का;'या' खेळाडूने घेतली निवृत्ती

भारताला धक्का;’या’ खेळाडूने घेतली निवृत्ती

मुंबई | Mumbai

आशिया चषक (Asia Cup 2022) स्पर्धेला कालपासून सुरुवात झाली असून आज दुसऱ्या दिवशी भारत आणि पाकिस्तान (India and Pakistan) यांच्यात महामुकाबला होणार आहे. मात्र, या सामन्यापूर्वीच भारतीय फिरकीपटू राहुल शर्माने (Rahul Sharma) क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेतल्याने भारताला मोठा धक्का बसला आहे…

- Advertisement -

राहुल शर्माने चार एकदिवसीय व दोन टी-२० सामन्यात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच त्याने आयपीएलमध्ये (IPL) २०१० साली पदार्पण केल्यानंतर वेगवेगळ्या संघांकडून खेळतांना दिमाखदार कामगिरी केली.

या हंगामात त्याने डेक्कन चार्जर्स संघाचे प्रतिनिधीत्व केले. त्यानंतर २०११ च्या हंगामात तो पुणे वॉरिअर्स (Pune Warriors) संघाकडून खेळला. या हंगामात त्याने एकूण १६ विकेट्स घेऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. याशिवाय २०१४ सालच्या आयपीएल हंगामात तो दिल्लीच्या संघाकडून खेळला. त्यानंतर २०१५ साली त्याला चेन्नई सुपरकिंग्ज (Chennai Super Kings) संघाने खरेदी केले होते.

दरम्यान, राहुल शर्माच्या करिअरला निश्चित दिशा मिळाली असताना त्याच्यावर ड्रग्ज (Drug) सेवनाचे आरोप करण्यात आले. परिणामी निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी त्याला बराच काळ झगडावे लागले. त्यानंतर ऐन उमेदीच्या काळात त्याला भारतीय क्रिकेट संघातील (Indian cricket team) स्थान गमवावे लागले.

- Advertisment -

ताज्या बातम्या