Friday, April 26, 2024
Homeनगरइंडियन मेडिकल असो.चे देशभर 8 व 11 डिसेंबर रोजी आंदोलन

इंडियन मेडिकल असो.चे देशभर 8 व 11 डिसेंबर रोजी आंदोलन

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

पदवीपर्यंत अलोपॅथीचे कोणतेही शिक्षण नसताना आयुर्वेदिक डॉक्टरांना शल्य चिकित्सक म्हणून पदवी देऊन

- Advertisement -

अनेक अवघड शस्रक्रिया करण्यास परवानगी दिल्याच्या विरोधात इंडियन मेडिकल असोसिएशनने दोन तीन टप्प्यात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनाची सुरुवात 8 डिसेंबरपासून करण्यात येणार आहे. तर 11 डिसेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्र व भारतभर वैद्यकीय सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

केंद्र सरकारकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्यास आयएमए नॅशनल सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असून यांच्या सर्व शाखा संबंधित उच्च न्यायालयांमध्ये व काही स्थानिक आयएमए शाखा संबंधित जिल्हा न्यायालयांमध्ये खटले दाखल करणार आहेत.

श्रीरामपूर इंडियन मेडिकल असोसिएशनच्यावतीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत पदाधिकर्‍यांनी विरोध केला. यावेळी राज्य कार्यकारिणी सदस्य डॉ. रवींद्र कुटे, श्रीरामपूरचे अध्यक्ष डॉ. मनोज संचेती, सचिव डॉ. संकेत मुंदडा, डॉ. सचिन पर्‍हे, डॉ संजय अनारसे, डॉ.अजित देशपांडे, डॉ. दिलीप शिरसाठ आदींनी पत्रकारांना माहिती दिली.

20 नोव्हेंबर रोजी सेंट्रल काउन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनने राजपत्र प्रकाशित केले असून त्यात आयुर्वेदीक पदवी घेणार्‍यांना शस्रक्रियांचे प्रशिक्षण देऊन जनरल सर्जरी,मूत्ररोग, पोटाच्या व आतड्याच्या,कान नाक घसा,नेत्र,दंत शस्रक्रिया आदींसारख्या 58 शस्रक्रिया करण्यास परवानगी दिली आहे. या निर्णयाला इंडियन मेडिकल असोसिएशनने विरोध दर्शविला आहे.

मंगळवार दि. 8 डिसेंबर 2020 रोजी सार्वजनिक ठिकाणी प्रत्येक शहर आणि गावात सर्व आयएमए सदस्य शांततामय निदर्शने करतील. फेस मास्क, पांढरा कोट आणि स्टेथोस्कोप परिधान करून 20-20 डॉक्टरांच्या गटात ही निदर्शने असतील. सर्व आयएमए सदस्य, एमएसएनए सदस्य, जेडीएन आणि माई यात सहभागी होतील.

तसेच तसेच 11 डिसेंबर 2020 रोजी संपूर्ण महाराष्ट्र आणि भारतभरात वैद्यकीय सेवा बंद, शुक्रवारी 11 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 6 ते संध्याकाळी 6 या दरम्यान सर्व अत्यावश्यक नसलेल्या सेवा कोव्हिड सेवा वगळता बंद राहतील. आपत्कालीन सेवा, अपघात, प्रसूतीगृहे, आपत्कालीन शस्त्रक्रिया या सेवा सुरू राहतील,

केंद्र सरकारकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्यास आयएमए नॅशनल सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असून यांच्या सर्व शाखा संबंधित उच्च न्यायालयांमध्ये व काही स्थानिक आयएमए शाखा संबंधित जिल्हा न्यायालयांमध्ये खटले दाखल करणार असल्याचा इशारा इंडियन मेडिकल असोसिएशनचे मानद राज्य सचिव डॉ. पंकज बंदरकर व अध्यक्ष डॅ. अविनाश भोंडवे यांनी दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या