Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यापाच गावांत लांडग्याचा नागरिकांवर हल्ला; १६ जखमी, लांडग्याचा मृत्यू

पाच गावांत लांडग्याचा नागरिकांवर हल्ला; १६ जखमी, लांडग्याचा मृत्यू

सिन्नर । Sinnar

तालुक्यातील पूतळेवाडी, विघनवाडी, उजनी, शहाजापूर (ता. कोपरगाव) व कोळगाव (ता. कोपरगाव) शिवारात लांडग्याच्या हल्ल्यात १६ जण जखमी झाल्याची घटना सोमवारी (दि. 11) पहाटेच्या सुमारास घडली. त्यातील तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जणांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. लांडगा पिसाळला असल्याची वार्ता असून या लांडग्याचा मृत्यू झाल्याचे समजते आहे….(indian jackal kill by villagers at sinnar and kopargaon taluka area)

- Advertisement -

तालुक्याच्या पूर्व भागातील उजनी (ujani), पुतळेवाडी (Putalewadi), विघनवाडी (Vighanwadi) व शहजापूर (Shahjapur), कोळगाव (Kolgaon) येथे पहाटे 4.30 वाजेच्या सुमारास विठाबाई अर्जून नरोडे यांच्यावर लांडग्याने हल्ला (Jackal attack) केला. त्यांच्या तोंडावर आणि अंगावर चावे घेतल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. त्यानंतर लांडग्याने विघनवाडीकडे पळ काढला.

तेथे सकाळी दहा वाजेच्या सुमारास लांडग्याने रस्त्याने जाणाऱ्या काही जणांवर हल्ला केला. यात ताराबाई काशिनाथ थोरात (वय 60), अलका चांगदेव म्हस्के या गंभीर जखमी झाल्या. यानंतर लांडग्याने परिसरातील वेणूबाई माधव थोरात, विमलबाई विष्णू डुबे, साईद जमाले सैय्यद यांच्यावर हल्ला करुन त्यांनाही जखमी केले.

सुरुवातीला कोणता वन्यप्राणी आहे याबाबत संभ्रम होता. मात्र, प्रत्यक्षदर्शींना तो लांडगा असल्याने दिसून आले. त्यानंतर या लांडग्याने कोपरगाव तालुक्यातील शहजापूर-कोळपेवाडीकडे मोर्चा नेला. याठिकाणीदेखील हल्ला करत नागरिकांना जखमी केले.

सिन्नरच्या वनपरिक्षेत्र अधिकारी मनिषा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सिन्नरच्या वनकर्मचाऱ्यांनी पूर्व भागात जाऊन पाहणी केली. हा हल्ल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.

प्राप्त माहितीनुसार, या लांडग्याचा कोपरगाव तालुक्यातील कोळगाव, शाहजापूर परिसरात मृत्यू झाला. हा मृत्यू लांडगा थकल्यामुळे झाला की, जमावाच्या हल्ल्यात झाला हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या