Saturday, April 27, 2024
Homeदेश विदेशचलनी नोटांवरील फोटोवरून राजकारण; पण भारतीय चलनाचा 'हा' इतिहास तुम्हाला माहितीय का?

चलनी नोटांवरील फोटोवरून राजकारण; पण भारतीय चलनाचा ‘हा’ इतिहास तुम्हाला माहितीय का?

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी नोटांवर (Indian Currency) लक्ष्मी आणि गणपतीचा फोटो छापण्याची मागणी केल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

अरविंद केजरीवाल यांच्या मागणीनंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. केजरीवाल यांच्या मागणीनंतर अनेक राजकीय पुढाऱ्यांनी नोटावर वेगवेगळ्या महापुरुषांचे फोटो छापा अशी मागणी लावून धरली. या पार्श्वभूमीवर भारतीय नोटांचा इतिहास जाणून घेणं महत्त्वाचं ठरतं.

- Advertisement -

भारतीय नोटांचं स्वरुप ब्रिटिश काळापासून अगदी स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत बदलत आलं आहे. स्वातंत्र्यपूर्वी काळात भारतीय नोटांवर ब्रिटनच्या राजाचं चित्र होतं.

मात्र, भारताला १५ ऑगस्ट १९४७ मध्ये स्वातंत्र मिळाल्यानंतर हे चित्र बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावेळी सारनाथच्या अशोक स्तंभावरील सिंहाचा फोटो घेण्याचा निर्णय घेण्यात आला. स्वतंत्र भारतातील भारतीय सरकारने पहिली नोट १९४९ मध्ये छापली. ती नोट एक रुपयांची होती.

१९६९ मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेने महात्मा गांधींच्या जन्मशताब्दीनिमित्त एक रुपयाच्या नोटेवर गांधीजींचा फोटो छापला.

त्यानंतर १८ वर्षांनी म्हणजेच १९८७ मध्ये महात्मा गांधींचा फोटो असलेली ५०० रुपयांची नोट छापण्यात आली. पुढे १९९६ मध्ये सर्वच नोटांवर महात्मा गांधींचा फोटो छापण्यात आला.

भारतीय चलनावर छापलेला गांधीजींचा फोटो हे पोर्ट्रेट नसून ते राष्ट्रपिता यांचे खरे चित्र आहे. नोटेवर दिसणारे हे चित्र १९४६ मध्ये राष्ट्रपती भवनासमोर घेतले होते, तेव्हा ते व्हाईसरॉयचे निवासस्थान होते.

भारतीय चलनातून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे चित्र हटवण्याची भाषा करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी २०१६ मध्ये मोदी सरकारने महात्मा गांधींच्या चित्राच्या जागी डॉ. भीमराव आंबेडकर यांचे चित्र लावण्याचे बोलले होते, मात्र नंतर हा निर्णय पुढे ढकलला.

त्यानंतर जून २०२२ मध्ये देखील आरबीआयने नोटेवर गांधीजींच्या चित्रासह डॉ. भीमराव आंबेडकर आणि डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचा वॉटरमार्क लावण्याबाबत बोलले होते. यासाठी आयआयटी दिल्लीलाही डिझाइन तयार करण्यास सांगितले आहे.

त्यापूर्वी २०१७ मध्ये स्थापन करण्यात आलेल्या आरबीआयच्या एका समितीने नोटेवर गांधीजींच्या चित्राशिवाय इतर सुरक्षा चिन्हे लावण्याबाबतही बोलले आणि समितीने २०२० मध्ये आपला अहवालही सादर केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या