Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्याभारताचा क्रिकेटपटू केदार जाधवचे वडील बेपत्ता

भारताचा क्रिकेटपटू केदार जाधवचे वडील बेपत्ता

पुणे : pune

भारताचा क्रिकेटपटू (Indian cricketer) केदार जाधवचे (Kedar Jadhav) वडील (father ) बेपत्ता (missing) झाले असल्याची माहिती आता समोर आली आहे. याबाबतची तक्रार कोथरूड पोलिसांकडे दाखल करण्यात आली आली आहे.

- Advertisement -

‘s

केदारचे वडील महादेव जाधव हे ८५ वर्षांचे आहेत. आज सकाळी ११.३० वाजता ते घरातून फिरायला बाहेर पडले, पण त्यानंतर अद्याप ते घरी परतलेले नाहीत. महादेव जाधव सिटी प्राईड कोथरूड येथुन रिक्षात बसुन सकाळी घराबाहेर पडले होते, अशी माहिती आता समोर येत आहे. महादेव जाधव यांना स्मृतीभ्रंशाचा आजार आहे, त्यामुळे त्यांना कोणीही पाहिल्यास त्वरीत संपर्क साधण्याचे आव्हान केदारच्या कुटुंबियांकडून करण्यात आले आहे.

केदार जाधव त्याच्या कुटुंबियासह पुण्यातील कोथरूड परिसरात वास्तव्यास आहेत. केदारचे वडील महादेव जाधव यांना स्मृतीभ्रंशाचा आजार आहे. त्यांना बर्‍याचशा गोष्टी लक्षात रहात नाहीत. त्यामुळे जाधव कुटुंबिय हे त्यांना आजारपणामुळे घराबाहेर पाठवत नाहीत. दरम्यान, आज दुपारी बावणे बारा वाजण्याच्या सुमारास महादेव जाधव हे फिरण्यासाठी त्यांच्या घराखालील मेन गेटजवळ गेले होते. तेथे काही वेळ चकरा मारल्यानंतर आऊट गेटने ते बिल्डींगमधून बाहेर पडून कोठेतरी निघुन गेले आहेत. कुटुंबियांनी त्यांचा शोध घेतला मात्र ते सापडले नसल्याने त्यांनी अलंकार पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

केदार जाधवचे वडील महादेव यांना कोथरूड परीसरात सकाळी पाहिले गेले होते. ते आपल्या घराखालीच काही काळ फेऱ्या मारत होते. पण त्यानंतर मात्र ते घराच्या गेटजवळ गेले आणि तिथून ते बाहेर पडले. काही जणांच्या मते तिथून त्यांनी रिक्षा पकडली होती, पण याबाबतची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. केदारचे वडील महादेव यांच्याकडे मोबाईल होते, असे समजते आहे. पण त्यांना मोबाईलही सध्या बंद येत असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आता त्यांच्याशी संपर्क तरी कसा करायचा, हा प्रश्न केदार जाधव यांच्या कुटुंबियांना आता पडलेला आहे. त्यामुळे त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलीस त्यांचा तपास करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या