Happy Birthday Rohit Sharma : तुम्हाला माहीत आहे का? रोहित शर्माच्या नावावर आहेत ‘हे’ मोठे विक्रम

jalgaon-digital
4 Min Read

मुंबई | Mumbai

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याचा आज वाढदिवस आहे. ३० एप्रिल १९८७ रोजी नागपूर येथे रोहित शर्माचा (Rohit Sharma) जन्म झाला होता. रोहितच पूर्ण नाव रोहित गुरुनाथ शर्मा, त्याचा जन्म नागपुरच्या बनसोद इथला. मात्र घरातली परिस्थिती बेताची असल्यामुळे तो त्याच्या आजी आजोबांसोबत मुंबईतल्या बोरिवली येथेच राहायचा. रोहितला लहानपणापासूनच क्रिकेटचे वेड होते.

लोक त्याला सामना खेळण्यासाठी बोलवायचे. लोकांच्या घरातील खिडकीच्या काचा त्यांच्या शॉट्सने फोडल्यामुळे ते देखील प्रसिद्ध होते. एकदा, याबद्दल पोलिसांत तक्रार सुद्धा गेली होती . तथापि, क्रिकेटचा प्रेमी रोहित शर्मा आपल्या काकाच्या सहकार्याने १९९९ मध्ये क्रिकेट कॅम्पमध्ये सामील झाला. तेथील प्रशिक्षक दिनेश लाड यांनी त्यांना शाळा बदलून स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय शाळेत जाण्यास सांगितले. तेथे ते स्वत: प्रशिक्षक होते आणि उत्तम क्रिकेट सुविधा देखील तेथे उपस्थित होती . वयाच्या 20 व्या वर्षी त्याने आंतरराष्ट्रीय कारकीर्दीची सुरुवात केली, विश्लेषकांनी रोहितची फलंदाजीची कौशल्ये पाहिल्यानंतर आणि त्यानंतर लवकरच त्याचा भारतीय क्रिकेट संघात समावेश करण्यात आला. 

भीषण दुर्घटना! पंजाबच्या लुधियानामध्ये गॅस गळती; ९ जणांचा मृत्यू, ११ जणांवर उपचार सुरु

निळ्या रंगाची जर्सी, जर्सीचा नंबर ४५, तंदुरुस्त शरीरयष्टी, हिटमॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि बिंधास्त खेळासाठी ओळखला जाणारा रोहित, आक्रमक खेळासाठी प्रसिद्ध आहे. हिटमॅन रोहित बॅटिंग करत असताना जर एखादा उसळता चेंडू त्याने पूल केला तर समजायचे चेंडू मैदानाबाहेर असणार, पूल करणे हा त्याचा आवडता शॉट आहे.

Mann Ki Baat 100th Episode : ‘मन की बात’ माझ्या मनाची आध्यात्मिक यात्रा; पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन

२३ जून २००७ रोजी तो आयर्लंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात दिसला. २०१३ मध्ये तो भारतीय एकदिवसीय संघाचा सलामीचा फलंदाज ठरला आणि तेव्हापासून तो सलामीवीर फलंदाज म्हणून कामगिरी करत आहे. त्याने त्याच्या पदार्पणातल्या पहिल्या दोन कसोटी सामन्यात सलग दोन शतके ठोकली. त्यातील वेस्ट इंडिज विरुद्धच्या नोव्हेंबर २०१३ मधील ईडन गार्डन, कोलकाता येथे झालेल्या कसोटीत १७७ धावा करून त्याचे पहिले व वेस्ट इंडिज विरुद्धच्या वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे झालेल्या दुसऱ्या कसोटीत नाबाद १११ धावा करून त्याचे दुसरे शतक पूर्ण केले आहे.

रोहितच्या नावावर असलेले विक्रम

२ नोव्हेंबर २०१३ रोजी बंगलोर येथे झालेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात रोहितने २०९ धावा करून आपले पहिले द्विशतक पूर्ण केले असून याच सामन्यात त्याने १६ षटकार मारले आहे. रोहित शर्माने २०१४ मध्ये श्रीलंकाविरोधात २६४ धावांचा पाऊस पाडला होता. एकदिवसीयच नव्हे तर रोहित शर्मा याने टी २० क्रिकेटमध्येही धावांचा पाऊस पाडला आहे. टी-२० क्रिकेटमध्ये रोहित शर्मा याने चार शतके झळकावली आहे. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये चार शतके झळकावणारा रोहित शर्मा एकमेव भारतीय खेळाडू आहे.

रोहितने आत्तापर्यंत एकदिवसीय सामन्यांमध्ये तीन द्विशतके ठोकली आहेत जसे २०९ , २६४ , २०८. आणि टी-२० मध्ये ४ शतके केली आहेत, यासोबतच त्याच्या नावावर अनेक विक्रमांची नोंद आहे. २०१७ मध्ये श्रीलंकेविरुध्द टी-२० सामन्यामध्ये ३५ चेंडूत शतक ठोकणारा तो जगातील दुसरा क्रिकेटपटू असून एक दिवसीय सामन्यात तीन द्विशतकं ठोकणारा तो जगातील एकमेव फलंदाज आहे.

दरम्यान, २०११ मध्ये आयपीएलमध्ये तत्कालीन मुंबई इंडियन्सचा कर्णधार रिकी पाँटिंगने आयपीएलमधून निवृत्ती घेतल्यापासून रोहित शर्मा मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार झाला असून त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स संघाने  २०११ , २०१३ , २०१५ , २०१७ आणि २०१९ ,२०२० मध्ये पाच वेळा संघ जिंकला आहे. याशिवाय रोहितच्या नेतृत्वात दोनदा चॅम्पियन्स लीग टी -२० जिंकल्या आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *