Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्यासैन्यदलात भरती व्हायचंय? मग हे विशेष पॉडकास्ट तुमच्यासाठी

सैन्यदलात भरती व्हायचंय? मग हे विशेष पॉडकास्ट तुमच्यासाठी

नाशिक | प्रतिनिधी

दर वर्षी भारतीय लष्कराकडून १५ जानेवारी हा दिवस लष्करदिन किंवा सैन्य दिन म्हणून साजरा केला जातो.. यंदाचे वर्ष हे लष्कर दिनाचे ७३ वे वर्ष आहे. १५ जानेवारी १९४९ रोजी जनरल करियप्पा यांनी भारताचे पहिले लष्कर प्रमुख म्हणून सूत्र स्वीकारली होती…

- Advertisement -

भारतातील ब्रिटीश कमांडर इन चिफ जनरल सर फ्रान्सिस बचर यांच्याकडून करियप्पा यांनी सूत्रे हाती घेतली होती. या ऐतिहासिक क्षणानिमित्त १५ जानेवारी हा सैन्य दल दिवस म्हणून साजरा केला जातो.

भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर चीन आणि पाकिस्तानबरोबर झालेल्या युद्धात, तसेच कारगीलमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या घुसखोरीच्या वेळी निर्भयपणे भारतीय जवानांनी शत्रुचा पराभव केला. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये देशामध्ये शांतता प्रस्थापित करण्यामध्येही जवानांचा सहभाग आहे.

भारतीय सैन्यदलात दाखल होण्यासाठी काय पात्रता लागते? सैन्यदलात सैनिकांपासून अधिकाऱ्यांपर्यंत अनेक भरती प्रक्रिया पार पडतात. या नेमक्या कशा असतात? कोण कशा पद्धतीने या भरतीसाठी पात्र होऊ शकते? याबाबत सविस्तर चर्चा केली आहे नाशिकमधील भोसला मिलिटरी स्क्रूलचे प्राध्यापक योगेश भदाणे यांच्याशी. संवाद साधलाय देशदूत डिजिटलचे दिनेश सोनवणे यांनी.

- Advertisment -

ताज्या बातम्या