Thursday, April 25, 2024
Homeनाशिकगुगल प्ले स्टोअरला 'हे' भारतीय अँप टक्कर देणार

गुगल प्ले स्टोअरला ‘हे’ भारतीय अँप टक्कर देणार

मुंबई | Mumbai

गुगल आणि अँपल च्या मोनोपोलिपासून सुटका मिळवण्यासाठी आता भारत स्वत:चे अॅप स्टोर लॉन्च करण्याचा प्लॅनिंग करत आहे.

- Advertisement -

यामुळे भारतीय युजर्सला गुगलवर अवलंबून रहावे लागणार नाही आहे. साधारण भारतात जवळजवळ ५०० मिलियन स्मार्टफोन उपयोगकर्ते असून त्यामधील बहुतांश गुगल अॅन्ड्रॉइड प्लॅटफॉर्मचा वापर करतात.

परंतु भारतीय स्टार्ट अप कडून अशा काही कंपन्यांच्या गोष्टींवर टीका केली आहे जे त्यांच्या वृद्धीवर बंदी घालत आहेत.

दरम्यान सरकार भारतीय स्टार्टअपची मदत करण्यासाठी पुढे येत आहे. त्यासाठीच स्वत:चे अॅप स्टोअर लॉन्च करण्याची तयारी करत आहे. याचे विशेष असे की, गुगल किंवा अॅपल हे अॅप स्टोअर 30 टक्के कमिशन सुद्धा घेणार नाही आहे.

सध्या सरकार या अॅप स्टोरची तयारी करत असून ते अॅन्ड्रॉइड फोनमध्ये प्री-इंस्टॉल्ड अॅपच्या आधारावर उपलब्ध करुन दिला जाणार आहे. परंतु अद्याप सरकार कडून अॅप स्टोर संबंधित अधिकृत स्पष्टीकरण दिलेले नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या