Tuesday, April 23, 2024
Homeक्रीडाWorld Cup 2022 साठी भारतीय महिला संघाची घोषणा, पुन्हा भारत-पाकिस्तान आमनेसामने

World Cup 2022 साठी भारतीय महिला संघाची घोषणा, पुन्हा भारत-पाकिस्तान आमनेसामने

दिल्ली | Delhi

यंदाचा महिला एकदिवसीय विश्वचषक हा न्यूझीलंडलमध्ये होणार आहे. या विश्वचषकमध्येही भारत – पाकिस्तान (India vs Pakistan) सामन्याचा थरार क्रिकेट रसिकांना अनुभवता येणार आहे.

- Advertisement -

दरम्यान बीसीसीआयने देखील आयसीसी विश्वचषक २०२२ स्पर्धेसाठी आणि न्यूझीलंड विरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेसाठी १५ सदस्यीय खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे.

मिताली राजच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघात झुलन गोस्वामी, हरमनप्रीत कौरसारख्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. मिताली राज आणि झुलन गोस्वामीची ही शेवटची विश्वचषक स्पर्धा असू शकते. विश्वचषक स्पर्धा सुरू होण्यापूर्वी भारतीय संघ न्यूझीलंड संघाविरुद्ध होणाऱ्या मालिकेत दोन हात करणार आहे. येत्या ११ फेब्रुवारी २०२२ पासून न्यूझीलंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये ५ वनडे सामन्यांची मालिका पार पडणार आहे. विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचा पहिला सामना पाकिस्तान संघाविरुद्ध पार पडणार आहे.

भारतीय संघ-

मिताली राज (कर्णधार), हरमनप्रीत कौर (उपकर्णधार), स्मृति मंधाना, शेफाली वर्मा, यास्तिका भाटिया, दीप्ति शर्मा, ऋचा घोष (विकेटकीपर), स्नेह राणा, झूलन गोस्वामी, पूजा वस्त्रकार, मेघा सिंह, रेणुका सिंह ठाकुर, तानिया भाटिया (विकेटकीपर), राजेश्वर गायकवाड, पूनम यादव.

राखीव खेळाडू : एकता बिष्ट, सिमरन दिल बहादुर आणि साभीनेनी मेघना.

असे आहे विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचे वेळापत्रक

६ मार्च – भारत विरुद्ध पाकिस्तान, तौरंगा

१० मार्च – भारत विरुद्ध न्यूझीलंड, हॅमिल्टन

१२ मार्च – भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, हॅमिल्टन

१६ मार्च – भारत विरुद्ध इंग्लंड , तौरंगा

१९ मार्च – भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, ऑकलँड

२२ मार्च – भारत विरुद्ध बांगलादेश, हॅमिल्टन

२७ मार्च – भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, ख्राईस्टचर्च

दरम्यान, आश्चर्याची गोष्ट म्हणजे भारताच्या या संघात जेमिमा रोड्रिग्ज, शिखा पांडे आणि राधा यादव यांसारख्या खेळाडूंना संधी देण्यात आलेली नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या