Monday, April 29, 2024
Homeक्रीडाIND vs SL : आजपासून श्रीलंकेविरुद्धच्या T-20 मालिकेचा थरार

IND vs SL : आजपासून श्रीलंकेविरुद्धच्या T-20 मालिकेचा थरार

दिल्ली l Delhi

शिखर धवनच्या (Captain Shikhar Dhawan) नेतृत्त्वाखालील भारतीय संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर असून उभय संघात मर्यादित षटकांची मालिका सुरु आहे. नुकतीच श्रीलंका विरुद्ध भारत वनडे (IND vs SL ODI 2021) मालिका पार पडली आहे. भारताने २-१ ने ही मालिका खिशात घातली आहे. त्यानंतर आजपासून (२५ जुलै) ३ सामन्यांच्या टी२० (IND vs SL T-20) मालिकेला सुरुवात होणार आहे.

- Advertisement -

भारत (India) आणि (Shrilanka) श्रीलंका यांच्यात खेळवण्यात येणाऱ्या टी२० मालिकेतील पहिला सामना आज रात्री ८ वाजता खेळवण्यात येणार आहे. श्रीलंकेतील कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियममध्ये (Colombo Premadasa Stadium) हा सामना खेळवण्यात येईल. आजचा सामना खिशात घालून श्रीलंकेविरोधातील टी२० मालिकेची सुरुवात विजयानं करण्यासाठी भारतीय संघ प्रयत्नशील असणार आहे.

भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन :

शिखर धवन (कर्णधार), पृथ्वी शॉ, इशान किशन, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, क्रुणाल पांड्या, वरुण चक्रवर्ती, युजवेंद्र चहल, दीपक चाहर आणि भुवनेश्वर कुमार.

या टी२० मालिकेच्या तारखा आणि वेळा

पहिला सामना – कोलंबो – २५ जुलै (रविवार) – रात्री ८ वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार)

दुसरा सामना – कोलंबो – २७ जुलै (मंगळवार) – रात्री ८ वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार)

तिसरा सामना – कोलंबो – २९ जुलै (गुरुवार) – रात्री ८ वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार)

- Advertisment -

ताज्या बातम्या