Wednesday, April 24, 2024
Homeक्रीडाभारत - आयर्लंड आज आमनेसामने

भारत – आयर्लंड आज आमनेसामने

मुंबई । Mumbai

भारत आणि आयर्लंड (India & Ireland) संघांमधील २ सामन्यांच्या टी २० मालिकेतील (T20 series) पहिला सामना आज रात्री ८ वाजता डब्लिन (Dublin) येथे खेळविण्यात येणार आहे. या सामन्यात भारतीय संघाची (Indian team) कमान अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्यावर (Hardik Pandya) असणार आहे. प्रेक्षकांना या सामन्याचे थेट प्रक्षेपण सोनी सिक्स वाहिनीवर बघता येणार आहे…

- Advertisement -

भारताचा मुख्य संघ प्रमुख खेळाडूंसह इंग्लंड दौऱ्यावर असल्याने आयर्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी भारताने आपला दुय्यम संघ पाठवला आहे. या मालिकेसाठी राष्ट्रीय क्रिकेट प्रबोधिनीचे (National Cricket Academy) प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण (VVS Laxman) भारतीय संघाचे प्रशिक्षक असणार आहेत. तर आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये कर्णधार म्हणून आपल्या संघाला विजेतेपद मिळवून देण्यात मोलाचा वाटा असलेला हार्दिक पांड्या आता भारतीय संघाचे नेतृत्व करण्यासाठी सज्ज झाला आहे.

दरम्यान, या मालिकेत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशातील टी २० मालिकेत भारतीय डावाची सुरुवात करायची संधी मिळालेला ऋतुराज गायकवाडला (Ruturaj Gaikwad) संघातून डच्चू मिळण्याची शक्यता आहे.त्याच्याऐवजी वेंकटेश अय्यर आणि ईशान किशन (Venkatesh Iyer & Ishaan Kishan) डावाची सुरुवात करू शकतात. तसेच यष्टीरक्षणाची जवाबदारी ईशान किशन किंवा संजू सॅमसन (Sanju Samson) याच्यावर सोपवली जाण्याची शक्यता आहे. तसेच गोलंदाजीत हर्षल पटेल (Harshal Patel) आणि अवेश खानला (Avesh Khan) विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे. त्यांच्याजागी उमरान मलिक आणि आर्षदिप सिंगला (Umran Malik & Arshdeep Singh) संधी मिळू शकते .

सलिल परांजपे, नाशिक

- Advertisment -

ताज्या बातम्या