Tuesday, April 23, 2024
Homeक्रीडाइंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीसाठी भारतीय संघाची घोषणा

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीसाठी भारतीय संघाची घोषणा

दिल्ली l Delhi

इंग्लंडविरुद्धच्या अखेरच्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या मालिकेत पहिली कसोटी इंग्लंडने तर दुसरी कसोटी भारताने जिंकली.

- Advertisement -

मालिका १-१ अशा बरोबरीत असताना भारत आणि इंग्लंड यांच्यातील शेवटचे दोन कसोटी सामने अहमदाबादमध्ये खेळले जातील. या दोन सामन्यांसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) भारताचा १७ जणांचा संघ जाहीर केला आहे.

असा आहे भारतीय संघ –

विराट कोहली (कर्णधार)

रोहित शर्मा

मयंक अगरवाल

शुबमन गिल

चेतेश्वर पुजारा

अजिंक्य रहाणे (उपकर्णधार)

केएल राहुल,

हार्दिक पंड्या

रिषभ पंत (यष्टीरक्षक)

वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक)

आर अश्विन

कुलदीप यादव

अक्षर पटेल

वॉशिंग्टन सुंदर

इशांत शर्मा

जसप्रीत बुमराह

मोहम्मद सिराज

उमेश यादव

वेगवान गोलंदाज उमेश यादव दुखापतग्रस्त होता. तो थेट अहमदाबादमध्ये संघात दाखल होणार आहे. त्याची दुखापकृत पूर्णपणे बरी झाली आहे की नाही याचा वैद्यकीय समितीकडून आढावा घेण्यात येईल. त्यानंतर त्याला संघात दाखल केलं जाईल. तो संघात आल्यानंतर ‘पालघर एक्स्प्रेस’ शार्दुलला चमूतून बाहेर सोडलं जाईल आणि तो विजय हजारे करंडक स्पर्धेत सहभागी होईल, अशी माहितीही देण्यात आली.

तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ –

जो रूट (कर्णधार)

जेम्स एंडरसन

जोफ्रा आर्चर

जॉनी बेयरस्टो

डॉम बेस

स्टुअर्ट ब्रॉड

जॅक क्राउले

रोरी बर्न्स

बेन स्टोक्स

डॅन लॉरेन्स

जॅक लीच

ओली पोप

डॉम सिबले

बेन फोक्स

ओली स्टोन

ख्रिस वोक्स

मार्क वुड

दरम्यान, अहमदाबाद येथील जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियम असणाऱ्या मोटेरा स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड संघात तिसरा आणि चौथा कसोटी सामना होणार आहे. तिसरा सामना दिवस- रात्र कसोटी सामना असून हा सामना २४ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. तर चौथा सामना ४ मार्चपासून सुरु होणार आहे. या स्टेडियमवर होणारा दिवस-रात्र कसोटी सामना हा भारतातील दुसराच दिवस-रात्र कसोटी सामना असणार आहे. तर भारतीय क्रिकेट संघाचा हा एकूण तिसरा तर इंग्लंडचा हा एकूण चौथा दिवस-रात्र कसोटी सामना असणार आहे. तसेच हा दिवस-रात्र कसोटी सामना पुर्नबांधणी करण्यात आलेल्या मोटेरा स्टेडियमवर होणारा पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना असेल. तिसऱ्या कसोटीला भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी २.३० वाजता सुरुवात होईल. तर चौथा सामना सकाळी ९.३० वाजता सुरु होईल.

- Advertisment -

ताज्या बातम्या