Ind vs Aus : स्मृती मानधनानं रचला इतिहास, ‘हा’ ऐतिहासिक कारनामा करणारी पहिली भारतीय

jalgaon-digital
1 Min Read

दिल्ली | Delhi

भारतीय महिला संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ऐतिहासिक दिवस-रात्र कसोटी सामना (India Women vs Australia Women) गुरुवारपासून (३० सप्टेंबर) सुरू झाला आहे.

या कसोटी सामन्यामध्ये दुसऱ्या दिवशी भारताच्या महिला क्रिकेटपटूंनी आघाडी घेतली आहे. मात्र, यात भारतीय संघाची सलामीवीर स्मृती मंधानानं शतकी खेळी करत एक अनोखा विक्रम आपल्या नावे केला आहे. या शतकामुळे स्मृती मंधाना गुलाबी चेंडूने खेळवण्यात येणाऱ्या कसोटी सामन्यांमध्ये शतक झळकावणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली आहे.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटीच्या पहिल्या दिवशी पावसाचा अडथळा आला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी लगेच स्मृतीनं शतक पूर्ण केलं आहे. स्मृतीची ही चौथीच कसोटी आहे. या कसोटीमध्ये तिनं पहिलं शतक पूर्ण केलं आहे.

नाणेफेक गमावल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाला स्मृतीनं दमदार सुरूवात करुन दिली. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या शेवटच्या एकदिवसिय सामन्यात अर्धशतक झळकावणाऱ्या स्मृती मंधानानं या कसोटीमध्येही लय कायम राखली आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *