Thursday, April 25, 2024
Homeक्रीडाIND vs AUS : ऑस्ट्रेलिया संघ हातावर काळ्या पट्ट्या बांधून मैदानावर उतरला......

IND vs AUS : ऑस्ट्रेलिया संघ हातावर काळ्या पट्ट्या बांधून मैदानावर उतरला… कारण काय?

दिल्ली | Delhi

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ४ टेस्ट मॅचची सीरिज सुरू आहे. या सीरिजची चौथी आणि निर्णायक टेस्ट मॅच अहमदाबादमध्ये सुरू आहे. आज मॅचच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाची टीम काळ्या पट्ट्या लावून मैदानात आली.

- Advertisement -

ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू पॅट कमिन्स याच्या आईचे कॅन्सरमुळे निधन झाले. हे वृत्त कळताच शोक प्रकट करण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूंनी मॅचच्या दुसऱ्या दिवशी दंडाला काळ्या पट्ट्या (ब्लॅक आर्म बँड) लावून खेळण्याचा निर्णय घेतला. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ट्वीट करून या निर्णयाची माहिती दिली.

आजीची सोनसाखळी हिसकावणाऱ्या चोरट्याला १० वर्षाच्या नातीने दाखवला इंगा, पुण्यातील VIDEO व्हायरल

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने म्हंटले आहे की, “मारिया कमिन्स यांचे रात्री निधन झाल्याचे आम्हाला खूप दुःख आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या वतीने, आम्ही पॅट, कमिन्स कुटुंब आणि त्यांच्या मित्रपरिवारासाठी मनापासून शोक व्यक्त करतो. ऑस्ट्रेलियन पुरुष संघ आज आदराचे चिन्ह म्हणून ब्लॅक आर्म बँड घालून खेळेल.”

रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम ED च्या ताब्यात

ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार पॅट कमिन्सने घरी राहण्यासाठी आणि आजारी आईसोबत राहण्यासाठी भारताविरुद्धच्या उर्वरित दोन कसोटी सामन्यांमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला होता. “माझी आई आजारी असल्याने मी सध्या भारतात न परतण्याचा निर्णय घेतला आहे आणि मी तिची काळजी घेण्यासाठी आलो आहे,” असे कमिन्सने एका निवेदनात म्हटले आहे.

Womens Day 2023 : अंधकारातून ‘ती’ नेते प्रकाशाकडे…! ‘लाईनवुमन’चा हा VIDEO पाहून तुम्हीही ठोकाल कडक सॅल्यूट

पॅट कमिन्सने नागपूर आणि दिल्ली येथे खेळल्या गेलेल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व केले. तिसऱ्या कसोटीपूर्वी त्याच्या आईची प्रकृती खालावली. आईची काळजी घेण्यासाठी तो मालिका सोडून ऑस्ट्रेलियाला परतला. त्यांच्या नेतृत्वाखाली पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव झाला होता. त्याचवेळी इंदोर कसोटीत कमिन्सच्या अनुपस्थितीत स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वाखाली भारताने ९ विकेट्स राखून विजय मिळवला.

Nagaland : BJP बरोबर NCP सत्तेत येणार, कसं आहे विरोधक नसलेलं नवं सरकार?

पॅट कमिन्सच्या आईचे दीर्घकालीन आजाराने निधन झाले. २००५ मध्ये त्यांना पहिल्यांदा ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचे समजले. गेल्या काही आठवड्यांपासून त्या एका गंभीर आजाराशी झुंज देत होत्या. बीसीसीआयनेही शोक व्यक्त केला, या कठीण काळात आमची प्रार्थना कमिन्स आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या