Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशपाकची कुरापत : सीमेजवळ 25 फूट खोल बोगदा

पाकची कुरापत : सीमेजवळ 25 फूट खोल बोगदा

श्रीनगर |srinagar –

सीमेवर पाकिस्तानच्या कुरापती सुरू आहेत. सीमा सुरक्षा दलानं आंतरराष्ट्रीय सीमेलगत भूयारी मार्गांचा शोध घेण्याची मोहीम हाती घेतली आहे. ही मोहीम सुरू असताना

- Advertisement -

बीएसएफला शनिवारी जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यातील बेंगालड परिसरात मोठा बोगदा आढळून आला. हा बोगदा जमिनीत 25 फूट खोलीवर असून, त्याची लांबी 150 मीटर असल्याचं लष्कराच्या अधिकार्‍यांनी सांगितलं.

या भूयारी मार्गाबरोबरच शक्करगढ, कराची लिहिलेल्या काही वाळूच्या पिशव्याही सापडल्या आहेत. या बोगद्यांपासून पाकिस्तानी लष्कराची चौकी 400 मीटर अंतरावर असल्याचंही लष्करानं म्हटलं आहे. पाकिस्तानातून येणारे दहशतवादी अशा भूयारी मार्गांचा भारतात घुसखोरी करण्यासाठी वापर करतात. या बोगदा सापडल्यानं लष्कराला घुसखोरीचा मोठा डाव उधळून लावण्यात यश आलं आहे.

यापूर्वीही लष्कराला जम्मूमधील आंतरराष्ट्रीय सीमेवर अशा प्रकारचे भूयारी मार्ग आढळून आले होते. 2012मध्ये सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना 400 मीटर लांबीचा बोगदा सापडला होता. हा बोगदाही सांबा सेक्टरमध्ये होता. तर दुसरा एक बोगदा पलनवाला सेक्टरमध्ये 2014 मध्ये आढळला होता. याच वर्षी सांबा जिल्ह्यातील छिल्लारी परिसरातही एक भूयारी मार्ग सापडला होता. हा भूयारी मार्ग भारतीय हद्दीत 25 मीटर आतपर्यंत करण्यात आला होता. त्याचबरोबर 2016 मध्ये पाकिस्तानातून येणारा आरएस पूरा सेक्टरमध्येही सापडला होता.

पावसामुळे काही ठिकाणी भूस्खलन झाल्यामुळे सीमा सुरक्षा दलाच्या जवनांना शंका आली. त्यामुळे त्वरीत मशीन मागवण्याच आले. तपासणी करतांना भूयारी मार्ग तयार होण्याच्या मार्गावर असल्याचे आढळून आले. बीएसएफच्या ‘व्हेलबैक’ चौकीजवळ हा मार्ग होता. बीएसएफने असे दुसरे मार्ग आहे का? हे शोधण्यासाठी आंतरराष्ट्रीय सीमेजवळ मोठे अभियान सुरु केले आहे. बीएसएफचे महानिरीक्षक (जम्मू) एनएस जामवाल यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहाणी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या