Saturday, April 27, 2024
Homeधुळेभारत बंद : धुळ्यात संयुक्त निषेध रॅली

भारत बंद : धुळ्यात संयुक्त निषेध रॅली

धुळे Dhule । प्रतिनिधी

केंद्रसरकारने (Central government) पारित केलेले शेतकरी विरोधी (anti-farmer laws) 3 कायदे रद्द करुन शेतकर्‍यांच्या हितासाठी शेतकर्‍यांच्या दुधासह प्रत्येक मालाला हमी भाव (Guaranteed price) देणारा गॅरंटी कायदा करा यासह अन्य मागणीसाठी आज समविचार संघटनांनी (like-minded organizations) संयुक्तपणे पुकारलेल्या भारत बंद आंदोलनात धुळ्यातूनही पाठिंबा मिळाला. मोर्चा काढून निदर्शने (Joint protest rally)करीत केंद्र सरकार विरोधात घोषणा देण्यात आल्या.

- Advertisement -

शेतकर्‍यांच्या दिल्ली नजीक सुरु असलेल्या आंदोलनाला दहा महिने पुरे होत असुन आतापर्यत 600 पेक्षा जास्त शेतकर्‍यांनी बलिदान दिले आहे. केंद्र सरकारच्या हिटलरवादी प्रवृत्तीने शेतकर्‍यांना मवाली, खलिस्तानवादी, नक्षलवादी, नकली किसान अशा अनेक उपमा देऊन शेतकर्‍यांची थट्टा करीत आहेत. कृषी कायदे, शिक्षण व कामगारांविरोधातील कायदे या एकूणच धोरणांविरोधात आज 27 रोजी भारत बंदची हाक देण्यात आली.

धुळ्यातून शेतकरी बचाव, लोकशाही बचाव मंच तसेच सत्यशोधक कष्टकरीसभा यांच्यासह विविध संघटनांच्या वतीने एकत्रित मोर्चा काढण्यात आला.

काँग्रेसचे माजी मंत्री रोहिदास पाटील, कार्याध्यक्ष तथा धुळे ग्रामीणचे आ.कुणाल पाटील यांच्या नेतृत्वात मनोहर टॉकीज परिसरातील छ.शिवाजी महाराज पुतळा ते म.गांधी पुतळा दरम्यान निषेध रॅली काढण्यात आली. या रॅलीत ज्येष्ठ नेते एम.जी. धिवरे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष शाम सनेर, शहराध्यक्ष युवराज करनकाळ, माजी आ.शरद पाटील, शिवसेनेचे महेश मिस्त्री, इंटक जिल्हाध्यक्ष प्रमोद सिसोदे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रणजित भोसले, मुझफ्फर हुसेन, शकिल अन्सारी, मुकुंद कोळवले, इंटकवे प्रमोद सिसोदे, सेवा दलाचे रमेश दाणे, लाल निशाण पक्षाचे सुभाष काकुस्ते, एस.यु.तायडे, सत्यशोधक शेतकरी संघटनेचे कॉ.किशोर उमाले, कॉ.वसंतराव पाटील, बाबुराव नेरकर, रत्नशिल सोनवणे, हमाल मापाडी संघटनेचे हेमंत मदाणे, गंगाराम कोळेकर, आप्पा खताळ, भागवत चितळकर, देवेंद्र पवार, रवींद्र पानपाटील, अ‍ॅड.राहुल वाघ, कॉ.प्रकाश सोनवणे, शांताराम पवार, सुरेश मोरे, एल.जे.गावीत, अनिल दामोदर, संजय अहिरे, हरिश्चंद्र लोंढे, प्रभाकर खंडारे, सीटूचे कॉ.एल.आर.राव, अंनिसचे डॉ.सुरेश बिराडे, कॉ.पोपटराव चौधरी, साक्रीचे अ‍ॅड.नरेंद्र मराठे, राहुल वाघ, दीपक देसले, मयुर देवरे, भालचंद्र सोनगत, गळूभील, रतन सोनवणे, दीपकुमार साळवे, अब्दुल सत्तार शाह, सागर मोहिते आदींसह सर्वपक्षीय पदाधिकारी सहभागी झाले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या