Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशभारत-चीन सीमेवर ४५ वर्षांनंतर गोळी चालली

भारत-चीन सीमेवर ४५ वर्षांनंतर गोळी चालली

नवी दिल्ली

भारत-चीन सीमेवर ४५ वर्षांनंतर गोळी चालली. चीनकडून खोटा कांगावा करण्यात येत असल्याचा आरोपही भारतीय लष्कराने केला आहे.

- Advertisement -

चीनने गोळीबार भारताकडून झाल्याचा आरोप केला. तर भारतीय लष्कराने चीनकडून गोळीबार झाल्याचे सांगण्यात आले. प्रत्यक्ष सीमा रेषा ओलांडून भारतीय सैन्याने चीनच्या दिशेने कोणत्याही प्रकारचा गोळीबार केलेला नाही, असे स्पष्टीकरण भारतीय लष्कराकडून देण्यात आले आहे. चीनकडून खोटा कांगावा करण्यात येत असल्याचा आरोपही भारतीय लष्कराने केला. भारतीय लष्कराने म्हटले आहे की, ७ सप्टेंबर रोजी चीनची पीपुल्स लिबरेशा आर्मी (पीएलए) भारताच्या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करत होते. जेव्हा भारतीय सैन्याने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा चीनच्या सैनिकांनी गोळीबार केला. त्यानंतरही भारतीय सैनिक जबाबदारीने वागले. लाइन ऑफ एक्चुअल कंट्रोल (एलएसी) वरील परिस्थिति सामान्य करण्याचा प्रयत्न सुरु आहे. आम्ही एलएसी पार केली नाही किंवा फायरिंग केले नाही. याउलट चीनी सैन्याकडूनच काही भागात गोळीबार करण्यात आला आहे, असे भारतीय लष्कराने म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या